अनैसर्गिक कृत्याबाबत अल्पवयीनावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

शेजारी राहणारे १० वर्षीय पीडीत बालक टि व्ही बघायला आले होते, ही संधी साधुन संघर्षित बालकाने पीडीत बालकावर अनैसर्गिक संबध प्रस्थापित केल्याचे उघड झाले असुन पीडीत बालकाच्या तक्रारी वरून विधी संघर्षित बालकावर गुन्हा नोंदवून ताब्यात घेण्यात आले.
 

चिमूर - चिमूर शहरातील झोपडपट्टी वस्तीमधील १४ वर्षीय विधी संघर्षीत बालकाचे पालक लग्नाकरीता गेल्यामुळे हा एकटाच घरी होता. सायंकाळी ७:३० च्या सुमारास शेजारी राहणारे १० वर्षीय पीडीत बालक टि व्ही बघायला आले होते, ही संधी साधुन संघर्षीत बालकाने पीडीत बालकावर अनैसर्गिक संबध प्रस्थापित केल्याचे उघड झाले असुन पीडीत बालकाच्या तक्रारी वरून विधी संघर्षित बालकावर गुन्हा नोंदवून ताब्यात घेण्यात आले.

मोबाईल फोन वरील सहज उपलब्ध होणाऱ्या पॉर्न साईट चा परीणाम समाजजिवनावर पडत असुन त्यामुळे अनेक विकृत्या निर्माण झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. असाच काहीसा प्रकार चिमूर शहरातील झोपडपट्टी वस्ती येथे राहणाऱ्या १४ वर्षीय बालकांचे आई वडील त्यांच्या मुळ गावी लग्नास गेले असता हा घरी एकटाच होता. त्याच्या जेवणाची व्यवस्था शेजारी केली होती. सायंकाळी ७:३० च्या सुमारास पिडीत बालक टिव्ही पाहण्याकरीता त्यांच्या घरी आला मोबाईल फोनवरील पॉर्न साईटचे परीणाम झालेल्या विधी संघर्षीत बालकाने पीडीत बालकावर अनैसर्गिक अत्याचार केले.

पीडीत बालकाचे दुखणे वाढल्याने त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात नेले. डॉक्टरांच्या तपासणीत हा अनैसर्गिक कृत्याचे प्रकार लक्षात आले. याची माहिती चिमूर पोलिस विभागाला देण्यात आली. चिमूचे ठाणेदार प्रमोद मडामे यांनी या गंभीर कृत्याची दखल घेऊन चौकशी अंती पीडीत बालक व पालकाची तक्रार नोंदवुन घेतली. त्याप्रमाणे विधी संघर्षित बालकावर ३७७ भादवी ४, ६ पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवुन ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Filed a complaint of unnatural physical assault at chimur