पंधरा नगरसेवकांनी ठेवला नगराध्यक्षांच्या कामांवर हा ठपका; म्हणून आता...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

मानोरा नगरपंचायतीवर सर्वसमावेशक नगरविकास आघाडीची सत्ता आहे. एकूण 17 पैकी 15 नगर सेवकांनी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

मानोरा (जि.वाशीम) : येथील नगरपंचायत नगराध्यक्ष बरखा अलताफ बेग यांच्यावर 15 नगर सेवकांनी सोमवारी (ता.11) अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. हा अविश्‍वास प्रस्ताव जिल्हाधिकारी वाशीम यांच्याकडे सुपूर्द केला. विकासकामे न करने, नगरसेवकांना विश्‍वासात न घेणे, शासकीय योजनांचा लाभ जवळच्या व्यक्तींना देणे आदी प्रकारचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मानोरा नगरपंचायतीवर सर्वसमावेशक नगरविकास आघाडीची सत्ता आहे. एकूण 17 पैकी 15 नगर सेवकांनी अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. त्यामधे उपाध्यक्ष अमोल राऊत, नगरसेवक ज्ञानेश्वर गोतरकर, रेखा पाचडे, छाया डाखोरे, शेख फिरोजाबी शेख मुस्ताक, शेख अबिदाबी नाजिम, सुनहरा परवीन वहीदोद्दीन शेख, सुनीता भोयर, ऊषाताई जाधव, शेख वहीद शेख अयूब, एहफाज शाह महमूद शाह, मंजूषा निशाने, हसिनाबी जब्बार शाह, अहमद बेग चंदबेग, गणेश भोरखडे यांचा समावेश आहे. अध्यक्ष पद एस. सी. प्रवर्गासाठी राखीव आहे.

आवश्यक वाचा - Video : पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले चक्क पोलिसांचेच स्टींग ऑपरेशन

त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. हा अविश्‍वास प्रस्ताव जिल्हाधिकारी वाशीम यांच्याकडे सुपूर्द केला. विकासकामे न करने, नगरसेवकांना विश्‍वासात न घेणे, शासकीय योजनांचा लाभ जवळच्या व्यक्तींना देणे आदी प्रकारचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - अबब! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणार स्टॅम्प, शासन आदेशाविरुद्ध सुरू आहे काम

मी समर्थपने नियमानुसार काम करते
मी समर्थपने नियमानुसार काम करीत आहे. काही लोकांना कापले काम का होत नाही असे वाटते. परंतु, नियम बाह्य काम करणार नाही. मी कुणाच्या हातची कठपुतळी नाही.
-बरखा बेग, नगराध्यक्षा नगरपंचायत मानोरा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed no-confidence motion against Nagar Panchayat President in washim district