एकीशी प्रेम, दुसरीशी लग्नाचा घाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

घरात किरायाने राहणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी लग्नाचा घाट घातला. हुडकेश्‍वर पोलिसांनी राहुल देवराव बोंद्रे (३०, रा. भोलेबाबानगर, हुडकेश्‍वर) या युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.

नागपूर - घरात किरायाने राहणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी लग्नाचा घाट घातला. हुडकेश्‍वर पोलिसांनी राहुल देवराव बोंद्रे (३०, रा. भोलेबाबानगर, हुडकेश्‍वर) या युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच युवतीला मारहाण करून मुलाला साथ देणाऱ्या आई-वडिलावरही गुन्हा दाखल केला.

पीडित १७ वर्षीय मुलगी माधुरी (बदललेले नाव) ही महाकालीनगरात आई-वडील व लहान भावासह किरायाने राहते. ती आठवीत असताना राहुल बोंद्रे याच्या घरी किरायाने राहत होती. राहुल हा आर्किटेक्‍चर असून, कंपनीत नोकरी करतो. माधुरी १४ वर्षांची असताना राहुलने घरात घुसून बलात्कार केला होता. कुणालाही सांगितल्यास लहान भावाला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती गप्प होती. हिंमत वाढल्याने तो माधुरीचे आई-वडील मजुरीला गेल्यानंतर बलात्कार करीत होता. तीन वर्षांपासून तो माधुरीचे लैंगिक शोषण करीत होता. ही बाब तिने आईला सांगितली. बदनामीच्या भीतीपोटी माधुरीच्या आई-वडिलांनी दुसरीकडे घर घेतले. मात्र, तेथेही राहुल येऊ लागला. सावरनेला ती बारावीत शिकत असताना अपहरण करून जंगलात बलात्कार केल्याचा आरोप आहे. माधुरी दोन महिन्यांची गर्भवती झाली. घाबरलेल्या राहुलने तिला औषधी देऊन गर्भपात करवून घेतला.

आई-वडिलांनीही दिली साथ
आरोपी राहुलने माधुरीला लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, आठ दिवसांपूर्वीच त्याने लग्नासाठी अन्य एका मुलीकडे मागणी घातली. ही माहिती मिळताच रविवारी रात्री माधुरी राहुलच्या घरी गेली. तेथे वडील देवराव बोंद्रे व आई अनिता बोंद्रे यांनी माधुरीला शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed in rape case against youth in nagpur