मुख्याधिकाऱ्यांसह ६० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - नगरसेवकांची तक्रार

संजय सोनोने 
गुरुवार, 24 मे 2018

रकायदेशीर मंडळी जमवून दहशत निर्माण करून पोलीस स्टेशन मध्ये (सार्वजनिक ठिकाणी) अनधिकृतपणे प्रवेश कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शेगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी व ५० ते ६० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी शेगाव नगर पालिकेतील विरोधी पक्षातील ४ नगरसेवकांतर्फे फ्राफुल्ल ठाकरे यांनी पोलिसात केली आहे.
 

शेगाव (बुलढाणा) : गैरकायदेशीर मंडळी जमवून दहशत निर्माण करून पोलीस स्टेशन मध्ये (सार्वजनिक ठिकाणी) अनधिकृतपणे प्रवेश कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शेगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी व ५० ते ६० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी शेगाव नगर पालिकेतील विरोधी पक्षातील ४ नगरसेवकांतर्फे फ्राफुल्ल ठाकरे यांनी पोलिसात केली आहे.

शेगाव नगर पालिकेचे नगर सेवकप्रफुल्ल ठाकरे, श्री. शैलेश पटोकार, श्री. प्रफुल्ल ठाकरे, शैलेश डाबेराव, आशिष गणगणे व योगेश पल्हाडे यांनी नगर पालिकेच्या ताब्यातील शहर हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या बाजूने झाडे लावण्यात आलेली आहे. या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची आहे. मात्र सदर मोठमोठी झाडे ही पाण्याअभावी जळत आहेत. याबाबत अनेकवेळा न.प. सभागृहात आवाज उठविण्यात आला. मात्र यावर मुख्याधिकारी अतुल पंत यांनी लगेच टँकर सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र बराच अवधी उलटूनही झाडांना पाणी देण्यात आले नसल्याने १७ मे रोजी सुकलेल्या झाडांची तिरडी आंदोलन मार्गाने आंदोलन केले. दरम्यान मुख्याधिकारी पंत यांनी पोलिसात तक्रार नोंदवून आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. 

तिखोटे यांच्या नेतृत्वात ५० ते ६० कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला पोहचून तक्रार दाखल केली होती. यानंतर आंदोलकांची नुकतीच जमानतीवर सुटका झाल्यानंतर त्यांनीही पोलिसात तक्रार नोंदवली त्यांच्या म्हणण्यानुसार कर्मचारी शासकीय कामकाज सोडून नागरिकांवर आणि पोलिसांवर दबाव आणि दहशत निर्माण करण्यासाठी ही मंडळी बेकायदेशीरपणे पोलीसस्टेशनच्या इमारतीत पोहचले. एका सहीचे सहीचे एक निवेदन यावेळी देण्यात आले. याचा अर्थ उर्वरित मंडळी ही फक्त दबाव आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तेथे पोहचली होती. यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडधिकारी, बुलढाणा यांनी मनाई आदेश जारी केलेला असतांना कर्मचारी बेकायदेशीररित्या शासकीय कामकाज सोडून टोळी तयार करून नगर पालिका ते पोलीस स्टेशन पर्यंत पोहचले. व पोलीस नगर पालिका आणि पोलीस स्टेशनच्या आवारात बेकायदेशीररित्या दबाव व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने जमा झाले. जे आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येईल. यामुळे शहरातील नागरिकांवर आणि आमच्यावर दहशत निर्माण झाली होती. यामुळे गैरअर्जदारांनी कायद्याचे उल्लंघन आणि पोलीस स्टेशन मध्ये अवैधरित्या प्रवेश करून त्यांनी गुन्हा केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना भडकाविणाऱ्या मुख्याधिकारी अतुल पंत सह सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी या नगरसेवकांतर्फे यावेळी करण्यात आली आहे. 

Web Title: Filing of over 60 employees, including the chiefs, shegoan Corporators complaint in police station