राज्याचे वाहतूक धोरण अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

राज्याचे वाहतूक धोरण अंतिम टप्प्यात
नागपूर : शहर स्मार्ट, सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्था बळकट व पर्यावरणपूरक असावी, असे प्रत्येक महापौरांचे स्वप्न असते. सरकार शहरी वाहतुकीसंदर्भातील धोरण तयार करीत असून, नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. नागरिकांच्या सूचनांसह अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेतील चर्चेतून आलेल्या सूचनांचाही धोरण तयार करताना विचार केला जाईल, असे विश्‍वास राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी व्यक्त केला.

राज्याचे वाहतूक धोरण अंतिम टप्प्यात
नागपूर : शहर स्मार्ट, सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्था बळकट व पर्यावरणपूरक असावी, असे प्रत्येक महापौरांचे स्वप्न असते. सरकार शहरी वाहतुकीसंदर्भातील धोरण तयार करीत असून, नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. नागरिकांच्या सूचनांसह अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेतील चर्चेतून आलेल्या सूचनांचाही धोरण तयार करताना विचार केला जाईल, असे विश्‍वास राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी व्यक्त केला.
सिव्हिल लाइन्स येथील चिटणीस सेंटरमध्ये आयोजित तीनदिवसीय "अर्बन मोबिलिटी इंडिया' परिषद व प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, केंद्रीय गृहनिर्माण व शहर व्यवहार विभागाचे सचिव संजय मूर्ती, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित होते.
शहरी वाहतूक नागरिकांसाठी सहज असली पाहिजे. परंतु, नागरिकांकडून ती स्वीकारली जात नाही. केवळ मेट्रोवर नव्हे शहरातील बससेवा आणखी चांगली करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पादचाऱ्यांना अनुकूल रस्ते तसेच सायकलसाठी वेगळे ट्रॅक तयार करणेही आवश्‍यक आहे. राज्याच्या धोरणात याचा समावेश केला जाईल. जलवाहतूक अजून दूर आहे. त्यामुळे शहराच्या वाहतुकीत मेट्रोची भूमिका महत्त्वाची आहे, असे नितीन करीर म्हणाले.
पंचतत्त्वाचे पावित्र्य राखण्यासाठी पर्यावरणपूरक वाहतूक गरजेची आहे. वाहतूक धोरण सामाजिक दृष्टिकोन ठेवून तयार व्हावे. स्थानिक शहरातील वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असून, मुंबईतील लोकल याचे उत्तम उदाहरण आहे. या लोकलमधून गणेशोत्सवासारखे कार्यक्रम केले जाते. प्रकल्पांना निधी, तांत्रिकदृष्ट्या उत्तम प्रकल्पांसोबतच नागरिकांत जनजागृतीही महत्त्वाची असल्याचे महापौर नंदा जिचकार म्हणाल्या. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी मेट्रो निश्‍चितच उत्तम सेवा आहे. परंतु, प्रवाशाला घरापासून गंतव्य ठिकाणापर्यंत प्रवास करता येईल, अशी सुविधा हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुढील वर्षी लखनऊमध्ये परिषद
शहरी वाहतुकीबाबत पुरस्कार पटकावणाऱ्या हिमाचल प्रदेश व मणिपूरमुळे शहरी वाहतूक व्यवस्था योग्य दिशेने बळकट होत आहे.
पुढील वर्षी अर्बन मोबिलिटी परिषद 15 ते 17 नोव्हेंबरपर्यंत लखनऊमध्ये आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहनिर्माण व शहर व्यवहार विभागाचे सचिव संजय मूर्ती यांनी केली. मूर्ती यांनी आयोजनासाठी राज्य सरकारचे आभार मानले.
धोरणासाठी परिषद मैलाचा दगड
अर्बन मोबिलिटी परिषदेत अनेक संस्था व विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या मंथनातून पुढे आलेले मत व सूचना शहर वाहतूक धोरणासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे परिषद धोरणासाठी मैलाचा दगड आहे, असे मत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी व्यक्त केले. योग्य धोरण व त्याची अंमलबजावणी आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. डॉ. दीक्षित यांनी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले.

Web Title: In the final phase of the state's transport strategy