अखेर अहेरीच्या ग्रामसेवकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

वणी (जि. यवतमाळ)  : तालुक्‍यातील अहेरी ग्रामपंचायतमध्ये बनावट स्वाक्षऱ्या करून 17 लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली होती. या प्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली. या प्रकरणात ग्रामसेवक दोषी असल्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्याने शुक्रवारी (ता. 4) ग्रामसेवक गुहाडे यांना अटक करण्यात आली आहे.

अहेरी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक देवराव गुहाडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने मदतीसाठी त्यांनी निवली येथील प्रशांत बोढे या युवकाला कामावर ठेवले होते. या युवकाने त्याचा मित्र लंकेश नरुले याच्या मदतीने अहेरी ग्रामपंचायचे चेकबुक मिळविले व ग्रामपंचायतीचे खाते असलेल्या ऍक्‍सिस, आयडीबीआय व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील खात्यातून चौदावा वित्त आयोग, सामान्य निधी व पाणीपुरवठा निधीचे 17 लाख 69 हजार रुपये लंपास केले. ही बाब ग्रामसेवक गुहाडे यांच्या उशिराने लक्षात आल्याने त्यांनी याबाबत वणी पोलिसात तक्रार दाखल केली.  पोलिसांनी प्रशांत बोढे व लंकेश नरुले या दोघांना ऑगस्ट महिन्यात अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गटविकास अधिकारी राजेश गायनार यांनी दिलेल्या अहवालात ग्रामसेवक गुहाडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून तेही या अफरातफरमध्ये सहभागी असल्याचा अहवाल दिल्याने पोलिसांनी ग्रामसेवक गुहाडे यालाही अटक केली. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, Aheri's village servant arrested