अखेर फाईलचोरी प्रकरण पोलिसात पोहोचले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

अमरावती : महापालिकेच्या लेखा विभागातून फाईलचोरी प्रकरण अखेर पोलिसात पोहोचले आहे. लेखा विभागाने यासंदर्भात शहर कोतवाली पोलिसांत रितसर तक्रार दाखल करून फौजदारी कारवाईची विनंती केली आहे. गत गुरुवारी (ता. 13) लेखा विभागातून मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या टेबलहून श्री साई सुशिक्षित बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था या कंत्राटदाराची फाईल चोरून नेण्यात आली होती. या संदर्भात चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये अफसर खान या व्यक्तीने ती फाईल नेल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने फाईल नेल्याची कबुली देत ती परत आणून दिली व माफीनामा लिहून दिला.

अमरावती : महापालिकेच्या लेखा विभागातून फाईलचोरी प्रकरण अखेर पोलिसात पोहोचले आहे. लेखा विभागाने यासंदर्भात शहर कोतवाली पोलिसांत रितसर तक्रार दाखल करून फौजदारी कारवाईची विनंती केली आहे. गत गुरुवारी (ता. 13) लेखा विभागातून मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या टेबलहून श्री साई सुशिक्षित बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था या कंत्राटदाराची फाईल चोरून नेण्यात आली होती. या संदर्भात चौकशी केली असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये अफसर खान या व्यक्तीने ती फाईल नेल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने फाईल नेल्याची कबुली देत ती परत आणून दिली व माफीनामा लिहून दिला. मात्र शासकीय विभागातून फाईल चोरीस जाणे हा प्रकार गंभीर असल्याने लेखा विभागाने पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली. शहर कोतवाली पोलिसांत लेखा विभागातील लिपिक रितेश देसाई यांनी तक्रार दाखल केली असून तक्रारीनंतर गुन्हे नोंदविण्यात येतील, असे पोलिसांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, the file case was filed in the police custody