प्रशिक्षणार्थ्यांना मिळाली कार्यशाळा; प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा; आयटीआयच्या प्राचार्यांना हस्तांतरित 

प्रशिक्षणार्थ्यांना मिळाली कार्यशाळा; प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा; आयटीआयच्या प्राचार्यांना हस्तांतरित 

रामटेक, (जि. नागपूर) : जिल्हा प्रशासनाने शासकीय आयटीआयची कार्यशाळा गुरुवारी (ता. 28) आयटीआयचे प्राचार्य यांना हस्तांतरित केली. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.  याबाबतचे वृत्त "निवडणूक झाली, आतातरी ईव्हीएम हटवा' या शीर्षकाखाली 27 नोव्हेंबरला "दैनिक सकाळ"ने प्रकाशित केले होते. 

राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली. मतमोजणी होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ होऊनही आयटीआयची कार्यशाळा निवडणूक विभागाने आयटीआयच्या प्राचार्यांना हस्तांतरित केली नव्हती. 30 सप्टेंबरपासून ही कार्यशाळा निवडणूक विभागाने ताब्यात घेतली होती. निवडणुकीची सर्वच प्रक्रिया याच कार्यशाळेत पार पडली. मतमोजणी 24 ऑक्‍टोबरला झाल्यानंतरही कार्यशाळा हस्तांतरित करण्यात आली नसल्याने आयटीआयच्या प्राचार्यांनी दोन पत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देऊन प्रशिक्षणार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तरीही निवडणूक विभागाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. आयटीआयच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी ही कैफियत आमच्या तालुका बातमीदाराकडे मांडली. प्राचार्य तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली. 

प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा अनुभवही दिला जाईल

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दखल घेतली. दि. 28 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी रामटेकला भेट दिली. त्यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी आयटीआयचे प्राचार्य गुणानंद वासनिक यांना पत्र देऊन ही कार्यशाळा हस्तांतरित केली. प्राचार्यांनी कार्यशाळा पंचांसमक्ष उघडून त्यातील ईव्हीएमच्या बॅटरी व इतस्ततः विखुरलेले सामान पंचनामा करून एका खोलीत ठेवून कार्यशाळा मोकळी करून घेतली. आता त्या ठिकाणी त्या-त्या व्यवसाय प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थ्यांना करून दाखवले जाईल. त्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा अनुभवही दिला जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com