डाॅ. दाभोलकरांचे मारेकरी शोधून काढा - अंनिस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

अकोला : डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्षे दहा महिने झाले, तरी पोलीसांना अजूनही मारेकरी सापडले नाहीत. खुनाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ आज सकाळी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे वतीने अशोकवाटीका ते गुरुदेव आश्रम सुधीर काॅलनी या मार्गाने निर्भय माॅर्निग वाॅकचे आयोजन करण्यात आले.

या माॅर्निंग वाॅकच्या समारोप प्रसंगी वक्त्यांनी पुरोगामी विचारवंतावर होणारा हल्ला ही चिंतनिय बाब असल्याचे तसेच माणसं मारल्याने विचार संपत नसल्याचे मत व्यक्त केले. गुरुदेव आश्रम सुधीर काॅलनी येथे महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, गुरुदेव आश्रमाचे भानुदास कराळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संजय तिडके, प्रधान सचिव बबन कानकिरड व मानद वन्यजीव संरक्षक बाळ काळणे, काॅ. रमेश गायकवाड, काॅ रामचंद्र धनभार, काॅ. नयन गायकवाड, युवा संघटक रोहन बुंदेले, शुभम भोंडे, अविनाश थोरात उपस्थीत होते.

Web Title: find the criminal who killed dr dabholkar demand by andha shraddha nirmulan samiti