दहा महिन्यांनंतर तलाठ्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

धामणगावरेल्वे (ता. अमरावती) : तालुक्‍यातील निंभोरा बोडखा शिवारात असलेल्या एका शेतीप्रकरणात जिवंत व्यक्तीला मृत दाखवून तीन व्यक्तींना वारस चढविण्याच्या प्रकरणात तलाठ्यावर तब्बल दहा महिन्यांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे पोलिस आणि महसूल प्रशासन आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सदर दाखल्याच्या पुराव्यावरून भविष्यात कोर्टात वाद निर्माण होऊ शकतो, असे फिर्यादीचे म्हणणे असल्याने दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारला (ता. सात) सदर प्रकरणात दत्तापूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा जोपर्यंत खारीज होत नाही, तोपर्यंत शासकीय कामावर बहिष्कार व काम बंदचा इशारा तलाठी संघटनेने दिला आहे.
वारसाच्या फेरफारप्रकरणात देवीदास दुबे यांनी जिवंत व्यक्तीस मृत दाखवून खोटे वारस चढविल्याबाबत दत्तापूर पोलिसांत दहा महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून दत्तापूर पोलिसांनी मंडळ अधिकारी भगवान बावणे व पटवारी यादव झरबडे यांच्या विरोधात बुधवारला (ता. सात) गुन्हा दाखल केला. संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत शासकीय कामावर बहिष्कार व कामबंद आंदोलन सुरू करणार असल्याचे निवेदन विदर्भ पटवारी संघटनेचे अध्यक्ष पी. व्ही. पिंजरकर, उपाध्यक्ष अमोल श्रीखंडे आदींनी तहसीलदार भगवान कांबळे यांना बुधवारी दिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR register after ten years against talathi