कैद्याचा कारनामा! तपासणीसाठी गेला अन् चपलेत गांजा घेऊन आला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अकोला: कारागृहात विचाराधीन कैदी म्हणून असलेल्या एका कैद्यास वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय तपासणीनंतर परत येताना त्या कैद्याने चक्क चपलेत गांजाच आणला होता. हा प्रकार कारागृह प्रशासनाच्या लक्षात येताच कारागृह प्रशासनाने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार देऊन त्या कैद्यावर विविध गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार बुधवारी (12) दुपारी घडला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृह प्रशासनाने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की तेल्हारा प्रथम श्रेणी न्यायालयाने 1 फेब्रुवारी 2020 रोजी आडगाव बु.

अकोला: कारागृहात विचाराधीन कैदी म्हणून असलेल्या एका कैद्यास वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय तपासणीनंतर परत येताना त्या कैद्याने चक्क चपलेत गांजाच आणला होता. हा प्रकार कारागृह प्रशासनाच्या लक्षात येताच कारागृह प्रशासनाने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार देऊन त्या कैद्यावर विविध गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार बुधवारी (12) दुपारी घडला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृह प्रशासनाने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की तेल्हारा प्रथम श्रेणी न्यायालयाने 1 फेब्रुवारी 2020 रोजी आडगाव बु. येथील रहिवासी लक्ष्मीकांत गोविंद चव्हाण यास चार महिन्यांची शिक्षा ठोठावली होती.

त्यानंतर त्याला कारागृहात पाठवून 5916  हा कैदी क्रमांकही दिला होता. तरी याच दरम्यान मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी विष्णू पन्नालाल पोरवाल याला अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये कैदी पोरवाल यास विचाराधीन कैदी म्हणून क्रमांक देऊन ठेवण्यात आले होते. बुधवारी या दोन्ही कैद्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कारागृह प्रशासनाने सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते.

वैद्यकीय तपासणीनंतर परत कारागृहात येणाऱ्या त्या कायद्यांची कारागृहातील कर्मचाऱ्यांनी अंगझडती घेतली. या झडती दरम्यान तपासी अंमलदार विजय उमराव इंगळे यांना कैदी विष्णुपुर पोरवाल यांच्या चपलेवर  संशय आला. या चपलेची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा दिसून आला. त्याला याबाबत विचारले असता त्याने हि चप्पल मला कैदी लक्ष्मीकांत चव्हाण यांनी दिल्याचे सांगितले. हा प्रकार लक्षात येताच कारागृह प्रशासनाने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी गांजाची मोजमाप केले असता तो 50 ग्रॅम भरला. यावरून आरोपी कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR registered against accused for keeping ganja in Sleeper in Akola