चंद्रपुरचा प्रसिद्ध झी बाजार आगीत खाक

chandrapu
chandrapu

चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला प्रसिद्ध झी बाजार सोमवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत खाक झाला. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चार ते पाच तासांच्या अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आली. दरम्यान, शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची माहिती आहे.
चंद्रपूर शहरातील जयंत टॉकीज परिसराला लागूनच झी सेल आहे. कपडे, दागिने, खेळणी, गृहपयोगी वस्तू यासह अन्य वस्तुंची या झी बाजारातून विक्री होते. बाजारापेक्षा कमी भावात या वस्तू मिळत असल्याने झी बाजार प्रसिद्ध आहे.

ख्रिसमयनिमित्त डिसेंबर महिन्यात दरवर्षी हा बाजार बंद असतो. जानेवारी महिन्यात बाजार पुन्हा सुरू झाला. रविवारी सुटीचा दिवस असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी होती. रात्री नेहमीप्रमाणे बाजार बंद झाला. मध्यरात्री अडीच ते तीन वाजताच्या सुमारास झी सेलला आग लागली. हळूहळू आगीने उग्ररूप धारण केल्यानंतर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत सुमारे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

तिबेटीयनची दुकाने बचावली...
झी बाजारला लागूनच तिबेटीयनची उबदार कपड्यांची दुकाने आहेत. तिबेटीयन मागील अनेक वर्षांपासून याच परिसरात आपापली दुकाने लावून व्यवसाय करीत आहेत. मात्र, झी बाजारला लागलेली आग लवकर आटोक्‍यात आली. त्यामुळे तिबेटीयनची दुकाने बचावली. अन्यथा नुकसानाचा आकडा पुन्हा वाढला असता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com