अकोला एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला आग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

आग लागण्या मागील नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. शिवाय अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त हाती आलेले नाही.

अकोला -  एमआयडीसी चारमधील अक्षय केमिकल कंपनीमध्ये आज (शनिवारी) पहाटे भीषण आग लागली. यावेळी स्फोटाचे आवाज येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीने रौद्ररुप धारण केले होते

दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. आग विझविण्यासाठी तीन बंब शर्थीचे प्रयत्न करीत होते. ज्यावेळी आग लागली त्यावेळी एमआयडीसी परिसरात मोठा स्फोट झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

आग लागण्या मागील नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. शिवाय अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त हाती आलेले नाही. घटनास्थळावर एमआयडीसी पोलिस दाखल झाले असून आग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती.

Web Title: fire at chemical factory in akola