बुलडाणा : वडशिंगी गावात शॉर्ट सर्किटने आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी गावात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी 5 ते 6 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

बुलडाणा : जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी गावात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी 5 ते 6 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी गावात काजेगाव मार्गावर असलेल्या झोपडपट्टी परिसरात सदर आग लागली आहे. रात्री 2.30 ते 3 वाजेदरम्यान गावातील झोपडपट्टी परिसरात शॉर्ट सर्किट झाले. गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्यामुळे गावात शांतता असल्यामुळे तसेच दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी चारा गोठ्यात भरून ठेवला असल्याने रात्री आगीची भीषणता वाढली. प्राथमिक माहितीनुसार आगीत चार ते पाच घरे जळाले असून, यात किशोर खंदारे यांच्या जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत शेगाव व खामगाव अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरू होते. 

तालुक्यातील वडशिंगी येथे आग लागल्यानंतर येथील पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर, पोलिसांनी तत्काळ जळगाव जामोद नगरपालिका अग्निशमन यंत्रणेला संपर्क केला परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर सदर माहिती बुलडाणा नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर शेगाव पालिकेची गाडी सकाळी 4.30 वाजता तर खामगाव पालिकेची गाडी सकाळी 6.30 वाजता गावात दाखल झाली. परंतु, 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगाव जामोद अग्निशमन दलाची गाडी उभीच होती. त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून रात्रीपासून अग्निशमन दलाल संपर्क करत असल्याचेही सांगितले.

Web Title: Fire due to short circuit at vadshingi Buldana