कारागृहाच्या गोडाऊनमध्ये आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नागपूर - वर्धा रोडवरील नागपूर मध्यवर्ती कारागृहात सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. कारागृहाच्या मागील बाजूला असलेल्या गोडाऊनमध्ये ही आग लागली. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून, आगीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात आले. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. अग्निग्रस्त गोडाऊनचा वापर कारागृहातील जुने साहित्य व अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी केला जात होता. त्यामुळे आगीत विशेष काही नुकसान झाले नसल्याचे समजते. 

नागपूर मध्यवर्ती कारागृहात दुपारी अचानक धूर निघायला लागला. जेल रक्षकांचे लक्ष गेल्यानंतर तटभिंतीजवळ असलेल्या भंगाराच्या गोडाऊनला लाग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच जेल अधीक्षक राणी भोसले यांना सूचना दिली तसेच अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत गोडाऊनमधील सर्व भंगार खाक झाले होते. तसेच गोडाऊनला लागून असलेल्या बराकपर्यंत आग पसरली होती. अग्निशमन दलाची सात वाहने कारागृहात पोहोचली. चार वाहनांनी जेलमध्ये जाऊन तर तीन वाहनांनी बाहेरील तटभिंतीवरून पाण्याचा मारा करून आग विझवली. अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या आतमध्ये प्रवेश करणे शक्‍य नसल्याने कारागृह इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतींच्या बाजूने बाहेरूनच आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके आणि नरेंद्रनगर अग्निशमन विभागाचे प्रमुख धर्मराज नकोड यांनी दिली.

कारण गुलदस्त्यात
मध्यवर्ती कारागृहातील भंगार ठेवलेल्या गोडाऊनशी कैद्याचा कोणताही संबंध नाही. गोडाऊन तटभिंतीजवळ आहे. त्यामुळे गोडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारचा विजेचे सॉकेट किंवा लाइटची सोय नाही. त्यामुळे कुणीतरी बाहेरील व्यक्‍तीने आगेचा टेंभा फेकला असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची चौकशी कारागृह प्रशासन करीत असून, धंतोली पोलिसांकडेही तक्रार केल्याची माहिती आहे. 

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप कळले नाही. मात्र आगेत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. भंगार आणि पडिक असलेल्या जुन्या लाकडी वस्तू जळाल्या आहेत. या प्रकरणात आम्ही चौकशी करीत आहोत.
- राणी भोसले, अधीक्षिका, मध्यवर्ती कारागृह, नागपूर.

Web Title: fire in jail godown