धावत्या एसटी बसने घेतला पेट

आशिष जयस्वाल
गुरुवार, 25 एप्रिल 2019

जोडमोहा (यवतमाळ) : एप्रिल महिन्यातील 44 अंश सेल्सिअस तापमान असह्य झाल्याने वाहने पेट घेल्याच्या घटना घडत आहेत. आज, गुरुवारी (ता. 25) दुपारी सव्वादोनच्या सुमारास  आदिलाबादवरून नेरला जाणाऱ्या एसटी बसने देखील पेट घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रवाशांना चालकाने सुखरूप बाहेर काढल्याने अनुचित घटना टळली. 

जिल्ह्यातील तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा पारा पार केला आहे. जीवाची लाहीलाही होत असल्याने नागरिक बाहेर पडायला पाहत नाहीत. मात्र, लग्नसराई असल्याने एसटी फुल्ल होऊन धावत आहे. बसने प्रवास सुरक्षित असतो म्हणून नागरिक बसचा प्रवास करतात. परंतु एसटी बसेसची फारच दुरवस्था झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जोडमोहा येथे आज दुपारी 2:15 मिनीटाच्या दरम्यान अदिलाबाद-नेर नामक, MH40 Y5518 ही बस अदीलाबादहुन नेरकडे जात असताना अचानक खालून पेटली.  पण याची कल्पना मात्र बस चालकाला नसल्यामुळे बस तसीच धावत होती. तेव्हा जोडमोहा येथील काही लोकांनी दुचाकीने समोर जावून बस चालकाला आगीबद्दल सांगितले व बस थांबवायला लावली.

बस थांबल्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून त्यानंतर जोडमोहा येथील लोकांनी बसला लागलेल्या आगीला विझवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.  प्रवाशांनी आग लक्षात आणून देणाऱ्या युवकांचे आभार मानले.

Web Title: Fire to ST bus at Yawatmal

टॅग्स