फटाके फोडून बिबट्याला घराबाहेर काढले!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : कुत्र्यांच्या शिकारीसाठी गावात आलेले बिबट इटोली येथे लताबाई देवतळे यांच्या घरात घुसल्याने एकच गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखत देवतळे यांनी घराचे मागचे दार बंद करून बिबट्यास जेरबंद केले. बिबट बाहेर निघावा म्हणून फटाके फोडून घराचे दार उघडण्यात आले. शेवटी वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेऊन त्याला जंगलात सोडले. शुक्रवारी (ता. 19) रात्री 11 वाजता सुरू झालेला बिबटमुक्तीचा प्रयत्न शनिवारला पहाटे चार वाजता पूर्ण झाला.

इटोली गाव जंगलव्याप्त आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात नेहमीच वन्यजीवांचा वावर असतो. शुक्रवारी (ता. 19) रात्री कुत्र्यांच्या मागे बिबट आला. कुत्रा देवतळे यांच्या घराच्या दिशेने गेला. बिबटही तिथेच घुसला. अचानक घरात बिबट घुसल्याने देवतळे कुटुंबीयांची बोबडीच वळली. मात्र, त्याही परिस्थिती त्यांनी घराचे दार बंद केले आणि सर्व सदस्य बाहेर पडले. बिबट घरात घुसल्याची वार्ता गावात पोहोचली. रात्री 11 वाजता गाव जागे झाले. सर्व गावकरी देवतळे यांच्या घराजवळ एकत्र आले. गावकरी बाहेर आणि बिबट आत स्थिती निर्माण झाली. दरम्यान, याची माहिती वनविभागाला दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहायक प्रवीण विरूटकर घटनास्थळी पोहोचले. देवतळे यांच्या घरासमोरील गर्दीला आटोक्‍यात आणण्यासाठी पोलिस बोलवावे लागले. गर्दी बाजूला करून बिबट्याच्या सुटकेचा प्रयत्न सुरू झाला. बिबट जंगलाच्या दिशेने पळविण्याकरिता गावाच्या दिशेने जाळी लावण्यात आली. त्यामुळे गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला. फटाक्‍यांचा आवाज ऐकून बिबट घराबाहेर पडला आणि वनाच्या दिशेने पळून गेला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fireworks burst from leapord out of the house!