कन्हानमध्ये गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

टेकाडी / कन्हान - नजीकच्या पिपरी येथे दोन गटांत झालेल्या वादातून गोळीबार व मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सांयकाळी उघडकीस आली. या घटनेत तिघे जखमी झाले. रोहन श्‍याम खरे हा गोळीबारात तर गब्बर भरत सोनटक्के व शुभम खोब्रागडे जखमी झाले.

गहूहिवरा येथील कॅटरिंगचा व्यवसाय करणारा रोहन खरे कामावरील मुलांची मजुरी देण्यासाठी पिपरी येथे त्याचा मित्र तुषार गायकवाडसह गेला होता. पिपरी रोडवरील चर्चजवळ पोहोचताच दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार ते पाच जणांनी त्याच्यावर देशी कट्ट्याने गोळीबार केला. गोळी पोटात लागल्याने रोहन गंभीर जखमी झाला. दोन्ही गटात वाद वाढत गेला. यात काठी, दगडाने गब्बर सोनटक्केला जबर मारहाण करीत झुडपात फेकण्यात आले. यानंतर देशी कट्टा घटनास्थळाजवळील देवीसिंग ठाकूर यांच्या घराजवळ फेकून आरोपी पसार झाले. जखमी रोहनला मित्रांनी रुग्णालयात दाखल केल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर गब्बर झुडपात आढळून आला. तर काही वेळानंतर शुभम खोब्रागडे पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी पोहोचला, त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. दोन्ही जखमींना उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.

Web Title: firing in kanhan crime