महावितरणची पहिल्याच दिवशी दमछाक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नागपूर : महावितरणने फ्रेंचाईझी क्षेत्रातील वीज यंत्रणेचा ताबा घेत कामाला सुरुवात केली. यंत्रणा नवीन असल्याने वीज कर्मचाऱ्यांची काहीशी दमछाक झाली. जुन्या तक्रारी निकाली काढण्यासह नव्याने दाखल झालेल्या सुमारे शंभर तक्रारींचे निरसन तातडीने करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे.

रविवारी मध्यरात्रीनंतर महावितरणने महाल, गांधीबाग, सिव्हील लाइन्स या तिन्ही विभागाचा ताबा घेतला. महापारेषणच्या मानकापूर, उप्पलवाडी, बेसा आणि पारडी या चार उपकेंद्रांसह आठ 33 केव्ही आणि 11 केव्ही क्षमतेच्या उपकेंद्रातील एकून 87 वीजवाहिन्यांवरील इनपूट मीटरसह एका क्रॉस ओवर फीडरच्या मीटरवरील नोंदी घेण्यात आल्या. महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित कार्यालयांचा पदभार स्वीकारला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first day of mahavitran