गोंदिया : बिरसी विमानतळावरून होणार १३ मार्चला पहिले प्रवासी उड्डाण

१३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. खासदार सुनील मेंढे यांनी बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी, यासाठी विषय लावून धरला होता.
first flight will take off from Birsi Airport on March 13 Gondia
first flight will take off from Birsi Airport on March 13 Gondiasakal

गोंदिया : बहुप्रतीक्षित आणि मागील अनेक वर्षांपासून उड्डाणाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंदिया येथील बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. १३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. खासदार सुनील मेंढे यांनी बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी, यासाठी विषय लावून धरला होता. गोंदिया येथील बिरसी विमानतळ तयार होऊन प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली नव्हती. या ठिकाणी प्रशिक्षित झालेले वैमानिक देशात विविध ठिकाणी सेवा देत आहेत.

प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने येथे अनेक अडचणी होत्या. खासदार सुनील मेंढे यांनी या विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्धार बोलून दाखवत त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. नागरी वाहतूक मंत्रालयाचे मंत्री, अधिकारी यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करून आणि भेट घेऊन त्यांनी पाठपुरावा केला. केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी काही महिन्यांपूर्वी भेट घेऊन त्यांना गोंदिया येथून प्रवासी वाहतुकीची आवश्यकता विशद केली होती. मंत्रिमहोदयांनी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेला तसे निर्देश दिले होते.

एक खासगी कंपनी गोंदिया ते इंदूर अशी वाहतूक सेवा सुरू करण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या कामाला गती आली. यातील अडचणी दूर करून व आवश्यक असलेल्या परवानग्या प्राप्त करून या वाहतुकीला आता परवानगी देण्यात आली आहे. १३ मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी उड्डाण होणार आहे. नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com