'सूर्या’च्या उष्णतेमुळे लावली आग!  हॉटेलचा पहिला मजला जळून खाक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

अकोला : येथील बाळापूर मार्गावर असलेल्या तुषार सिलिब्रेशन हॉटेलला शुक्रवारी (ता. 4) दुपारी अचानक आग लागली. यामध्ये हॉटेलच्या पहिल्या मजल्यातील साहित्य जळाले. उन्हाच्या अधिक तापमानामुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुर्य किरणे काचेवर एकवटली आणि एकाच केंद्रबिंदूतून पुढे गेल्याने स्टोअर रुमधील साहित्याला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

अकोला : येथील बाळापूर मार्गावर असलेल्या तुषार सिलिब्रेशन हॉटेलला शुक्रवारी (ता. 4) दुपारी अचानक आग लागली. यामध्ये हॉटेलच्या पहिल्या मजल्यातील साहित्य जळाले. उन्हाच्या अधिक तापमानामुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुर्य किरणे काचेवर एकवटली आणि एकाच केंद्रबिंदूतून पुढे गेल्याने स्टोअर रुमधील साहित्याला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

अग्निशमन विभागाने घटनास्थळ गाठून आग विझवली. शुक्रवारी राज्यात अकोल्याचे तापमान सर्वाधिक होते. या वाढत्या तापमानामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट होता. शुक्रवारी अकोला शहरातील तापमान 44 अंश सेल्सीअसच्या जपळपास होते. मात्र, या वाढत्या तापमानामुळे मागील काही दिवसापासून आगीच्या लागोपाठ घटना घडत आहेत. आतापर्यंत शहरात लागलेल्या आगीच्या घटनांचा तपशील पाहला तर सिलिंडरचा स्फोट आणि शॉटसर्कीट हीच कारणे समोर आली आहेत. मात्र, तुषार सिलिब्रेशन हॉटेलला लागलेल्या आगीचे कारण हे 'सूर्य' असल्याचे समोर येत आहे. कारण प्रकाशाच्या अभिसरणामुळे हॉटेलच्या स्टोअर रूमधील साहित्य जळून खाक झाले. या घटनेत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

ही घटना दुर्मिळ जरी असली तरी वाढते तापमान अकोल्यात कल्लोळ करीत आहे. 
शहरापासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर बाळापूर रस्त्यावर हे हॉटेल आहे. 
वाढत्या तापमानाचे मानवी जीवनावर होणारे अनेक दुष्परिणाम आपण ऐकले असतील. मात्र शुक्रवारी लागलेल्या आगीचे कारण हे 'सूर्यनारायण' असल्याचे समोर आले आहे. कारण प्रकाशाचे तीव्र किरणं काचेवर पडले. एका ठिकाणी एकवटून पुढे एकाच केंद्रबिंदूतून पुढे गेले आणि स्टोअर रूममधील साहित्य जळून खाक झाले. 

स्टोअर रूममध्ये कुठलीही इलेक्ट्रीक साहित्य नव्हते. गॅसे सिलिंडरही नव्हते. ही आग सुर्य किरणे काचावर पडून लागली. स्टोअर रूममध्ये बांधकाम साहित्य होते. किरणांचे रिफ्लेक्शन झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. 
-दीपक गोयंका, हॉटेल मालक 

काचेवर सूर्याची प्रखर किरणे पडून ते एकवटली जातात. त्‍यानंतर एका केंद्रबिंदूतून ती किरणे त्या काचेतून तीव्रतेने बाहेर पडतात. जर त्या जागेत अती ज्वलनशील पदार्थ असला तर तो पेट घेतो. या आगीचेही हेच कारण असू शकते. तेव्हा वाढत्या तापमानात दिवसा काचेच्या खिडक्या बंद न करता त्या उघडून ठेवाव्या. 
-प्रकाश फुलंबरकर, लीडींग फायरमन, अग्नीशमन विभाग.

Web Title: First Floor of Hotel burnt by itself in Akola due to extreme hot temperature