खुमारी तलावासाठी मासेमारांचे "हल्लाबोल'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

ब्राह्मणी (जि.नागपूर) :  कळमेश्वर तालुक्‍यातील खुमारी तलावावर धापेवाडा येथील कोलबास्वामी मागासवर्गीय मासेपालन सहकारी संस्थेचे अधिपत्य असून संस्थेचे बिगर कोळी समाजातील आहेत. तलावाच्या कार्यक्षेत्रातील मासेमारांना वगळून बाहेरील तालुक्‍यातील पारशिवनी, रामटेक येथील मासेमारी करणा-यांना कामे दिल्या जात असल्याचा मासेमारी करणा-यांचा आक्षेप आहे. त्याविरोधात आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात स्थानीक मासेमारांनी रविवारी हल्लाबोल आंदोलन केले.

संस्था1993-94मध्ये स्थापन करण्यात आली. त्यावेळेस देवनाथ पारशे हे अध्यक्षस्थानी होते. ती 2004पर्यंत पारशे यांनी चालवली. कालांतराने पारशे यांना मृत दाखवून संस्था ताब्यात घेतली. काही कालावधीपर्यंत सर्वांना काम मिळत होते. परंतु आपली फसवणूक झाली हे पारशे यांच्या लक्षात आले नाही. 2014 सालापासून जेव्हा स्थानिक मासेमारांनाकाम मिळणे बंद झाले. सभासद बनवणे बंद करण्यात आले, त्यावेळी खरी माहिती बाहेर आल्याचे देवनाथ पारसे यांनी सांगितले. याबाबत 23जानेवारी 2014 ला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही  मागील पंधरा दिवसांअगोदर काही मासेमारी करणा-यांवर सावनेर पोलिस ठाण्यात प्रकरणे दाखल करण्यात आलीत. परंतु मासेमारीमारी करणे हा आमचा हक्क असल्याने विदर्भ संघटक महेश नागपुरे यांनी आम्हाला आंदोलनसाठी मदत केली असल्याचे सांगितले. आंदोलनात आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात कळमेश्वर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक भागवत, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, तालुका खरेदी विक्री समितीचे अध्यक्ष बाबासाहेब कोढे, माजी सभापती वैभव घोंगे, उपसभापती नरेंद्र पालटकर, खरेदी विक्री उपाध्यक्ष आशीष देशमुख, राजेंद्र सुके, पंजाब चाफके, हरीचंद पारशे, नारायण दुरुगवार, दिवाकर बावने, राजेराम ढाले, केशव पारशे, किसन पारशे, बंडू पारशेंसह शेकडो महिला पुरुषांनी आंदोलनात सहभाग घेतला होता
कोळी समाजाच्या तलावातील मासे पकडण्याच्या हक्‍कासाठी शेवटपर्यंत लढा देणार असून तलाव व पूर्णसंस्था हक्कासह मिळवून देणार.
सुनील केदार
 आमदार, सावने

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fishermen's "attackball" agitation for Khumri Lake