कन्हान दरोड्यातील पाच आरोपींना गोंदियातून अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

गोंदिया - नागपूर जिल्ह्याच्या कन्हान येथील अमित ज्वेलर्समध्ये गोळीबार करून रोख रकमेसह दागिने लुटणाऱ्या तीन जणांना सूर्याटोला (गोंदिया) येथून अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (ता. २१) रात्री १ वाजताच्या सुमारास नागपूर ग्रामीण व गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने केली. आरोपींच्या ताब्यातून एक बंदूक, चार जिवंत काडतुसे, दोन किलोंवर सोने, चार मोबाईल व २४ हजार रुपये जप्त केले. 

योगेश यादव (वय २५, रा. स्वामी विवेकानंद नगर, कन्हान), नीतेश ऊर्फ आर्यन राठोड (वय २४, रा. कन्हान), जितेंद्र ऊर्फ भुरू मारुती धोटे (वय ३५, रा. रामनगर, गोंदिया) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. 

१४ मे रोजी अमित ज्वेलर्समध्ये सशस्त्र बुरखाधारी दरोडेखोर घुसले होते. त्यांनी बंदुकीतून गोळ्या झाडत ज्वेलर्स मालकाला धमकावले. त्यानंतर ज्वेलर्समधील २१ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेराबंद झाले होते. तथापि, घटनेचा तपास सुरू असतानाच या घटनेतील आरोपी गोंदियाच्या सूर्याटोला भागात असल्याची गुप्त माहिती नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार नागपूर ग्रामीण व गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने सूर्याटोला परिसरात रविवारी रात्री धडक दिली. भाड्याच्या एका घरात तिघेही दरोडेखोर राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. या भाड्याच्या घरात पोलिसांनी छापा टाकला. या वेळी तिघेही गाढ झोपेत होते. तिथेच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून एक बंदूक, चार जिवंत काडतुसे, दोन किलोंच्या वर सोने, चार मोबाईल व २४ हजार रुपये जप्त केले.

Web Title: Five accused in Kanhan Dock arrested from Gondia