खापरखेड्यात रात्रभरात पाच घरफोड्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

खापरखेडा (जि.नागपूर): वीजनिर्मिती केंद्रातील प्रकाशनगर वसाहतीत एकाच रात्री पाच वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. प्रकाशनगर वसाहत परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतरच्या सुमारास चोरट्यांनी वेगवेगळ्या क्वॉर्टरमधील समोरच्या दाराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे उघडकीस आले. घरफोड्यामध्ये रोख रक्कम सोन्याचांदीच्या दागिन्यासह जवळपास लाखोंचा रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. एका क्वॉर्टरमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. कारण त्या क्वॉर्टरमध्ये कुणीही राहत नव्हते. रूपाली बोंबाटे या वीज केंद्राच्या सौदामिनी कार्यालयात नोकरीवर आहेत.

खापरखेडा (जि.नागपूर): वीजनिर्मिती केंद्रातील प्रकाशनगर वसाहतीत एकाच रात्री पाच वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. प्रकाशनगर वसाहत परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतरच्या सुमारास चोरट्यांनी वेगवेगळ्या क्वॉर्टरमधील समोरच्या दाराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे उघडकीस आले. घरफोड्यामध्ये रोख रक्कम सोन्याचांदीच्या दागिन्यासह जवळपास लाखोंचा रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. एका क्वॉर्टरमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. कारण त्या क्वॉर्टरमध्ये कुणीही राहत नव्हते. रूपाली बोंबाटे या वीज केंद्राच्या सौदामिनी कार्यालयात नोकरीवर आहेत. त्या नागपूरला माहेरी गेल्या असता त्यांच्या घरून एक ग्राम सोने असलेले बेन्टेक्‍सचे मंगळसूत्र चोरीला गेले. नीलेश पडारे हे केंद्रात जलशुद्धीकरण विभागात रात्रीपाळीत कामावर असताना दाराचे कुलूप तोडून चांदीच्या 10नग अंगठ्या व दोन हजार रुपये रोख चोरीस गेले. विजयकुमार ढोके हे ऑपरेशन विभागात कर्मचारी असून पत्नी पारस येथे घराचे काम सुरू असल्यामुळे गेलेल्या आहेत. ते रात्रपाळीत ड्यूटीवर असताना चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे दागिने व 1200 रुपयांवर हात साफ केला. दीपाली सावरकर या पचमढीला गेल्या असताना त्यांच्याकडेही चोरी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासकार्य सुरू केले. पाऊस येत असल्यामुळे श्वानपथकाला अडचण निर्माण झाली असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. खापरखेडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five burglaries overnight in Khaparkhe