बुलडाण्यात दोन अपघातांत पाच ठार

Accident
Accident

नांदुरा (जि. बुलडाणा) - अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीला त्याच्या चार नातेवाईकांसह घेऊन जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील पोलिसांच्या वाहनाचा बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा-मलकापूरदरम्यान अपघात झाला. समोरून येणाऱ्या कंटेनरची धडक बसल्याने पोलिसांच्या मोटारीमधील चार जण जागीच ठार धाले, तर पोलिस उपनिरीक्षकासह तीन गंभीर जखमी आहेत.

हा अपघात सोमवारी पहाटे पाचच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील धानोरानजीक घडला. या घटनेच्या सहा तासांनंतर याच मार्गावर वडी फाट्याजवळ एका मोटारीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात मोटारचालक आशीष सुरेंद्रनाथ सोनार (वय 36, रा. निमखेडी रोड, जळगाव) जागीच ठार झाला.

पहिल्या घटनेत मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील सिमरोल पोलिस स्थानकांतर्गत येणाऱ्या गावातील अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून अपहरण केल्याप्रकरणी बोरगाव मंजू (जि. अकोला) येथील आरोपीला अटक करण्यासाठी इंदूर पोलिस अकोल्यात आले होते. आरोपीला अटक करून परत जात असताना हा अपघात झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com