अरे हे काय, पाचशेवर अंगणवाड्यांमध्ये नाही शौचालय

Five hundred Anganwadas have no toilets
Five hundred Anganwadas have no toilets

नागपूर  : जिल्ह्यातील ६३७ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसून ५३१ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण विभाग करते तरी काय, असाच सवाल उपस्थित होत आहे.

बालकांचे प्राथमिक शिक्षणापूर्वीचे शिक्षण हे अंगणवाड्यांमध्ये होत असते. जिल्ह्यात २४२३ अंगणवाड्या आहेत. यामध्ये २१६१ नियमित व २६२ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. यापैकी ६३७ अंगणवाड्यांना सरकारी शाळा, समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय किंवा भाड्याच्या खोलीत भरतात. बालवयातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांचे पोषण करण्याचे काम अंगणवाडीच्या माध्यमातून करण्यात येते. 

नियमानुसार १ हजार लोकसंख्येमागे एक अंगणवाडी सुरू करता येते. अंगणवाडीला मुलांच्या संख्येचे बंधन नसते. मुलांना पोषण आहार देण्याबरोबरच आरोग्यासह अन्य कामेदेखील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या माध्यमातून केली जातात. महिला व बाल कल्याण विभागाचे या अंगणवाड्यांवर नियंत्रण असते. अंगणवाडीला स्वतंत्र इमारत बांधून देण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. 

ज्या अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत आहे, त्या अंगणवाड्यांचीही अवस्था वाईट आहे. ज्या ठिकाणी अंगणवाडी सुरू करण्यासाठी काहीच सुविधा नाही, तिथे भाड्याने अंगणवाडी सुरू केल्या जाते. ५३१ अंगणवाड्यांमध्ये शौचालयांचीदेखील सुविधा नाही. इतकेच नव्हे तर अंगणवाड्यांमध्ये ८० सेविकांची तर १२८ मदतनिसांची पदेही रिक्त आहेत.

  • एकूण अंगणवाड्या २४२३
  • स्वतंत्र इमारत असलेल्या - १७८६
  • स्वतंत्र इमारत नसलेल्या - ६३७
  • शौचालय असलेल्या - १८९२
  • शौचालय नसलेल्या ५३१ 

 
संपादन : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com