पाचशे, हजारांच्या नोटांचे करायचे काय? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नागपूर - राज्य सहकारी बॅंक तसेच सहकारी बॅंकांच्या खात्यात पाचशे व हजार रुपयांच्या कोट्यवधींच्या नोटा पडून आहेत. साठवणुकीसाठी जागाही आता शिल्लक नाही. त्या कोणी घेत नसल्याने या नोटांचे करायचे काय? असा सवाल विदर्भ अर्बन बॅंक्‍स को-ऑपरेटिव्ह असोसिएनच्या शिष्टमंडळाने रिझर्व्ह बॅंकेला केला. 

नागपूर - राज्य सहकारी बॅंक तसेच सहकारी बॅंकांच्या खात्यात पाचशे व हजार रुपयांच्या कोट्यवधींच्या नोटा पडून आहेत. साठवणुकीसाठी जागाही आता शिल्लक नाही. त्या कोणी घेत नसल्याने या नोटांचे करायचे काय? असा सवाल विदर्भ अर्बन बॅंक्‍स को-ऑपरेटिव्ह असोसिएनच्या शिष्टमंडळाने रिझर्व्ह बॅंकेला केला. 

आरबीआयने सहकारी बॅंकेकडून जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. यामुळे सर्वच सहकारी बॅंकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. कोट्यवधी रुपये पडून आहेत. यामुळे सर्वच संचालक तसेच पदाधिकारी चिंतेत आहेत. गुरुवारी विदर्भ अर्बन बॅंक्‍स को-ऑपरेटिव्ह असोसिएशनचे अध्यक्ष कैलाशचंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वात तिरुपती बॅंकेचे नारायण आहुजा, रवी कमर्शियल बॅंक महेंद्र भागवतकर, निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे, गांधीबाग सहकारी बॅंकेचे संचालक रवींद्र दुरुगकर यांच्या शिष्टमंडळाने आरबीआयचे महाव्यवस्थापक पी. एस. वेंकटेश्‍वरन यांची भेट घेतली. नोटा बंदीमुळे नागरी सहकारी बॅंकांची झालेली कोंडी त्यांना सांगितली. सध्या चलनातून रद्द करण्यात आलेल्या हजार व पाचशेच्या नोटा सहकारी बॅंकांच्या खात्यात पडून आहेत. करंसीचेस्ट लिंक बॅंकेकडून नवीन व लहान नोटांचा पुरवठा होत नसल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व नागरी सहकारी बॅंकांना महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या खात्यात जमा झालेली व अतिरिक्त रोकड जमा करायची असते. बंदी घातल्याने राज्य बॅंकेने सहकारी बॅंकांकडून रक्कम स्वीकारणे बंद केले आहे. यामुळे सहकारी बॅंकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. खातेदारांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. वेंकटेश्‍वरन यांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात येईल, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. 

Web Title: five hundred, thousand notes on what to do?