पाच लाखांची वीजचोरी उघड; वीजचोरावर गुन्हा

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नांदेड : स्टोन क्रेशरला चोरीची वीज वापरणाऱ्या भानुदास गोमारेविरोधात कंधार ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याने सव्वापाच लाख रुपयांची 48 हजार 341 युनिटची चोरी केली होती. 

कंधार तालुक्यातील कुरूळा येथील भानुदास गोमारे या व्यक्तीने सहा महिन्यांपासून नागलगाव शिवारातील शेत गट नंबर २२१ मधील महावितरणचे ग्राहक क्रमांक ५८४१३०००४१२२, मीटर क्रमांक एमएसपी ००५५७ या थ्रीपेज वीज जोडणीतून अनधिकृत वीज वापर केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून गोमारे यांनी महावितरणची सुमारे 48 हजार 431 युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले आहे.

याबाबत महावितरणच्या कुरूळा शाखेचे सहाय्यक अभियंता बाबू राठोड यांनी कंधार ठाण्यात गोमारेविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक चाटे हे करीत आहेत. 

Web Title: Five lakhs Rupees of electricity theft