वणीत आणखी पाच लाख जप्त

File photo
File photo

वणी (जि. यवतमाळ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भरारी पथकाने रोख रक्कम जप्तीचा धडाकाच लावला आहे. गेल्या शुक्रवारी (ता.27) व रविवारी (ता. 29) या दोन दिवसांत निवडणूक भरारी पथकाने पाच लाख रुपये जप्त केले. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत यवतमाळ जिल्ह्यातून आतापर्यंत 58 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
गेल्या शुक्रवारी (ता. 27) येथील वरोरा मार्गावरील टी पॉइंटजवळ निळापूर येथील प्रकाश पवार यांच्याकडून तीन लाख 70 हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाडून कारवाईचा बडगा सुरूच असताना रविवारी (ता.29) तालुक्‍यातील शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या आबाई फाट्याजवळ लावण्यात आलेल्या नाकाबंदीत चंद्रपूर जिल्ह्यातील उसगाव येथील धनंजय ठाकरे यांच्याकडून एक लाख 68 हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली. योग्य कागदपत्रे सादर करू न शकल्याने ही रक्कम जप्त करून आयकर विभागाला कळविण्यात आले. ही कारवाई भरारी पथकाचे नायब तहसीलदार वैभव पवार, पीएसआय गोपाळ जाधव, मंडळ अधिकारी नितीन बांगळे, उल्हास निमेकर, विस्तार अधिकारी सुरेश पाझारे, शाखा अभियंता गोपाळ उमाटे यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत वणीत 34 लाख, पुसद येथे साडेअठरा लाख असे एकूण यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 58 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com