आणखी पाच मंत्री रडारवर - दमानिया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नागपूर - एकनाथ खडसे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अजून पाच दिग्गज मंत्री रडारवर असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी (ता. 18) सांगितले. रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावा करून लवकरच गौप्यस्फोट करण्याचे सूतोवाच दमानिया यांनी केले. 

भंडारा जिल्ह्यातील लाखन येथील विडी कामगारांच्या प्रश्‍नांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेच्या सुनावणीसाठी दमानिया नागपुरात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कॉंग्रेस भ्रष्टाचाराचे दुकान असेल तर भाजप "मॉल‘ असल्याचा आरोप करून फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांची यादी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून या मंत्र्यांविरुद्ध आलेल्या तक्रारी, भ्रष्टाचाराची प्रकरणे याची माहिती गोळा करण्यात आली आहे. यामुळे भाजपला नजीकच्या काळात एकापाठोपाठ एक दणके बसणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना देण्यात आलेली "क्‍लीन चिट‘ ही राजकीय खेळी आहे. मात्र, लवकरच खडसे, छगन भुजबळांच्या शेजारी बसलेले दिसतील, असे दमानिया म्हणाल्या. 

खडसे यांनी दमानिया यांच्यावर अब्रूनुकसानीचे एकूण 11 दावे दाखल केले आहेत. यावर त्या म्हणाल्या की, खडसे यांनी त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याची चांगली संधी मला दिली. या सर्व प्रकरणांमध्ये आपण वकिलाशिवाय लढणार आहोत. 

Web Title: Five more ministers on Radar, says Anjali Damania

टॅग्स