नागपूरमार्गे पाच स्पेशल ट्रेन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : नवरात्रीतच रेल्वेगाड्या हाउसफुल्ल धावत आहेत. त्यामागून येणाऱ्या दसरा आणि दिवाळीदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची प्रतीक्षायादी चांगलीच लांबत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. त्याच शृंखलेत देशाच्या वेगवेगळ्या भागांसाठी नागपूरमार्गे पाच स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. 

नागपूर : नवरात्रीतच रेल्वेगाड्या हाउसफुल्ल धावत आहेत. त्यामागून येणाऱ्या दसरा आणि दिवाळीदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची प्रतीक्षायादी चांगलीच लांबत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. त्याच शृंखलेत देशाच्या वेगवेगळ्या भागांसाठी नागपूरमार्गे पाच स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. 
हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष ट्रेन पाच फेऱ्या करणार आहे. 08609 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेन 2 ते 30 ऑक्‍टोबरपर्यंत प्रत्येक बुधवारी सायंकाळी 5.35 वाजता हटिया येथून रवाना होईल. ही गाडी गुरुवारी सकाळी 10.20 वाजता नागपूरला पोहोचेल आणि रात्री 11.55 वाजता एलटीटी स्थानक गाठेल. 08610 लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया स्पेशल ट्रेन 4 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी सकाळी 7.55 वाजता एलटीटी येथून रवाना होईल. ही गाडी त्याच दिवशी रात्री 10.05 वाजता नागपुरात पोहोचेल आणि शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता हटिया स्थानक गाठेल. या गाडीला दोन द्वितीय श्रेणी, चार तृतीय श्रेणी, चार स्लिपर कोच आणि तीन जनरल डबे राहतील. 
नागपूर-राजकोट दरम्यान दिवाळी स्पेशलच्या तीन फेऱ्या सोडण्यात येणार आहे. 01207 नागपूर-राजकोट स्पेशल ट्रेन 21 ऑक्‍टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक सोमवारी सायंकाळी 7.50 वाजता नागपूरहून रवाना होऊन मंगळवारी दुपारी 4.30 वाजता राजकोट स्थानक गाठेल. 01208 राजकोट-नागपूर स्पेशल ट्रेन 22 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवारी सायंकाळी 7.50 वाजता राजकोट येथून रवाना होईल व बुधवारी रात्री 10.15 वाजता नागपूर स्थानक गाठेल. या गाडीला द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित, नऊ स्लिपर व दोन जनरल डबे राहतील. 
संतरागाछी-हापादरम्यान तीन फेऱ्या चालविण्यात येणार आहे. 82034 संतरागाछी-हापा सुविधा स्पेशल ट्रेन शुक्रवारी 4 व 11 ऑक्‍टोबर आणि 1 नोव्हेंबरला रात्री 9.05 वाजता संतरागाछी येथून सुटेल. ही गाडी शनिवारी दुपारी 3.15 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि सोमवारी दुपारी 4.35 वाजता हापा स्थानक गाठेल. याचप्रमाणे 82033 हापा-संतरागाछी साप्ताहिक सुविधा स्पेशल ट्रेन सोमवारी 7 व 14 ऑक्‍टोबर आणि 4 नोव्हेंबरला सकाळी 10.40 वाजता हापा येथून सुटेल. ही गाडी मंगळवारी सकाळी 10.35 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि बुधवारी पहाटे 5.45 वाजता संतरागाछी स्थानक गाठेल. 
याचप्रमाणे 02834 संतरागाछी-हापा साप्ताहिक स्पेशल ट्रेन शुक्रवारी 18 व 25 ऑक्‍टोबरला रात्री 9.05 वाजता संतरागाछी येथून रवाना होईल. ही गाडी शनिवारी दुपारी 3.15 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि रविवारी दुपारी 2.45 वाजता हापा स्थानक गाठेल. 02833 हापा-संतरागाछी साप्ताहिक ट्रेन सोमवारी 21 व 28 ऑक्‍टोबरला सकाळी 10.40 वाजता हापा येथून रवाना होईल. ही गाडी मंगळवारी सकाळी 10.15 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि बुधवारी पहाटे 5.45 वाजता संतरागाछी स्थानक गाठेल. दोन्ही गाड्यांना प्रत्येकी 12 तृतीय श्रेणी वातानुकूलित व चार स्लिपर डबे राहतील. 
नागपूरहून डिब्रुगढसाठी मंगळवारी (ता. 1) सकाळी 10.30 वाजता विशेष ट्रेन सोडण्यात येईल. गुवाहाटीमार्गे धावणारी ही गाडी शुक्रवारी सकाळी 9 वाजता डिब्रुगढ स्थानक गाठेल. या गाडीला दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, नऊ स्लिपर आणि दोन जनरल डबे राहतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five special trains via Nagpur