यवतमाळ नगरपालिकेचे सूत्र महिलांच्या हाती, भाजपच्या कोट्यातून बसपला स्थायी समितीत संधी

five women elected as a chairperson of subject committee in yavatmal corporation
five women elected as a chairperson of subject committee in yavatmal corporation

यवतमाळ : येथील नगरपालिकेत अपेक्षेनुसार सर्व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे पाचही विभागांचे सूत्र महिलांच्याच हाती देण्यात आले आहे. गेल्यावेळी भाजपच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतिपद देण्यात आले होते. यावेळी बसपला स्थायी समितीत स्थान देण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.8) दुपारी तीनला नगरपालिकेच्या सभागृहात निवड सभा झाली.

येथील नगरपालिकेत भाजपचे बहुमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व बसपने यापूर्वीच पाठिंबा दिल्याने भाजपची स्थिती भक्कम आहे. त्यामुळे सभापतींची निवड बिनविरोध होणार, हे निश्‍चितच होते. त्यापूर्वी झालेल्या घडामोडीनंतर सभापतींची नावे निश्‍चित करण्यात आली. आपल्याला सभापतिपद मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्यांना अखेरच्या क्षणी दुसऱ्या विभागाचे सभापतिपद देण्यात आल्याने भाजपमध्ये अंतर्गत नाराजी दिसून आली. बांधकाम या महत्वाच्या विभागाची जबाबदारी विभा कुलकर्णी यांना देण्यात आली आहे. आरोग्य व वैद्यकीय सभापती साधना काळे, नियोजन व विकास खाते चंद्रभागा मडावी, शिक्षण सुजाता कांबळे, महिला व बालविकास सभापती पुष्पा ब्राम्हणकर, तर उपसभापतिपदी सुषमा राऊत यांची बिनविरोध निवड झाली. पाच वर्षांत एकाला एकदा संधी असे सूत्र ठरले आहे. त्यानुसार यावेळी नवीन नगरसेवकांना संधी देण्यात आली. यावेळी पाचही विभागांच्या सभापतिपदी महिला विराजमान झाल्या आहेत. नगराध्यक्षाही महिला आहेत. परिणामी खऱ्याअर्थाने पालिकेची सूत्रे आता महिलांच्याच हाती आली आहेत. पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी सुनील बल्लाळ उपस्थित होते. 

स्थायी समितीचे सदस्य -

  • नगराध्यक्ष : कांचन चौधरी
  • उपनगराध्यक्ष : सुभाष राय
  • विभा कुलकर्णी
  • सुजाता कांबळे
  • साधना काळे
  • चंद्रभागा मडावी
  • पुष्पा ब्राम्हणकर
  • गणेश धवने
  • संगीता कासार
  • प्रा. डॉ. अनिल देशमुख

भाजपमध्ये अंतर्गत नाराजी -
सभापतिपदावरून भाजपमध्ये अंतर्गत कुरबूर सुरू झाल्याची चर्चा आहे. सभापतिपदासाठी संगीता कासार व गणेश धवने यांची नावे आधीपासूनच चर्चेत होते. संगीता कासार यांना आरोग्य विभागाचेपद हवे होते. मात्र, त्यांना महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी नाव निश्‍चित करण्यात आले. त्यामुळे त्यांनी पद घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना स्थायी समितीत स्थान देण्यात आले असले तरी निवड समितीच्या बैठकीत 'त्या' अनुपस्थित नव्हत्या. त्यामुळे सभापतीपदावरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी पसरल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com