संघ कार्यालयात ध्वजारोहण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नागपूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त महालातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजता आयोजित केला आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. तसेच रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीतर्फे स्मृती मंदिर परिसरात सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध बाल अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विराज शिंगाडे उपस्थित राहतील. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाला स्वयंसेवकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगर समितीने केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flag hoisting at rss