बिल्डरच्या अरेरावीविरुद्ध फ्लॅटमालकांचे धरणे 

 flat owner against the builder's arbitrariness :
flat owner against the builder's arbitrariness :

गुमगाव, (जि. नागपूर) : नजीकच्या कोतेवाडा येथील फायर आर्कर बांधकाम कंपनीने तयार केलेल्या "इम्पेरियन टाऊनशीप'मध्ये फ्लॅटधारकांनी बिल्डरच्या अरेरावी व येथे असलेल्या असुविधांमुळे होत असलेलल्या गैरसोयीचा निषेध करण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी महिलांनी आवाज बुलंद करून समस्येविषयी हल्लाबोल केला. 

"इम्पेरियन टाउनशिप'मध्ये सार्वजनिक उपयोगाचे पाणी आणि स्ट्रीट लाइट वेळी-अवेळी बंद करणे, भेटायला आलेल्या पाहुण्यांना रस्त्यातच अडविणे, परिसरातील बागेकडे होणारे दुर्लक्ष आणि रस्त्यांच्या समस्यांसोबतच वेगवेगळ्या गोष्टींच्या नावाने सदनिका धारकांकडून वेगवेगळे चार्जेस उकळणे यांसारख्या अनेक गोष्टी आजतागायत सुरू असल्याचे सदनिकाधारकांचे म्हणणे आहे. 

मूलभूत सुविधा पुरविण्यात काटकसर

कित्येक मूलभूत सुविधा पुरविण्यात कंपनीचे अधिकारी काटकसर करीत असून नागरिकांची पिळवणूक करीत आहे. सदनिका विक्रीच्यावेळी फायर आरकर कंपनीने जी आश्वासने दिले त्याची अद्याप पूर्तता करीत नसल्याने आज सदनिका धारकांनी धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. बिल्डरने सदनिका विक्रीच्या वेळेस दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर पूर्तता करण्याची मागणी ताराचंद तांडेकर, मनोहर पटवर्धन, विजय ठाकरे, विनायक सगदेव, राजेंद्र राऊत, रवी सहाय, हितेश परमार, शशिकांत बोरकर व एम्पेरियन सिटी फ्रेंड्‌स ग्रुप फेज 2 मधील सर्व नागरिकांनी एकदिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com