फ्लोटिंग बोट करणार तलाव स्वच्छ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नागपूर : नुकतेच गणेशविसर्जन पार पडले असून, शहरातील फुटाळा तलावात मोठ्या प्रमाणात मूर्तींसह निर्माल्य व इतर कचरा गोळा झाला. या कचऱ्यासह शहरातील इतर तलावांत पाण्यावर निर्माण होणारी जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने आता फ्लोटिंग बोट खरेदीची तयारी केली. ही फ्लोटिंग बोट रिमोटने नियंत्रित करण्यात येणार असल्याने स्वच्छतेवेळी अपघाताचीही शक्‍यता नसल्याचे सूत्राने नमूद केले.

शहरातील तलावांच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबईने सहकार्य केले. फ्लोटिंग बोटद्वारे 300 किलोग्रॅमपर्यंत तलावातील प्लास्टिक, झाडांची पाने आदी कचरा एकाचवेळी काढला जाणार आहे. तलावाच्या काठावरूनच रिमोटने ही बोट संचालित केली जाईल. तलावांच्या स्वच्छतेसाठी आवश्‍यक "रिमोट कंट्रोल फ्लोटिंग बोट'बाबत महानगरपालिका व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आयुक्त सभागृहात आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे महाराष्ट्र कार्यालयाचे कार्यकारी संचालक मुरली श्रीनिवासन आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, तांत्रिक सल्लागार मोहंमद इस्राईल, उपविभागीय अभियंता मोहम्मद शफीक, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक राजेश जाधव, व्यापार विपणन विभागाचे उपमहाव्यवस्थापक सी. एम. घोडपागे, उपमहाव्यवस्थापक नितीन रोडगे, मुख्य क्षेत्र व्यवस्थापक अनिल मेहर आदी उपस्थित होते.
इंडियन ऑइलने दिले 29 लाख
शहरातील तलावांच्या स्वच्छता आणि सौंदर्यीकरणासाठी रिमोट कंट्रोल फ्लोटिंग बोटसाठी महानगरपालिकेने मुंबईतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे सीएसआर निधीमधून पाच फ्लोटर बोटची विनंती केली होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने एक फ्लोटर बोट खरेदीसाठी मनपाला दोन टप्प्यात 29 लाख रुपये देण्याचे मंजूर केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floating boat litter clean