अबब! धरणात आढळला पाण्यावर तरंगणारा दगड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • पाण्यावर तरंगणाऱ्या दगडाचे नागरिकांमध्ये कुतुहल
  • दुर्मिळ दगडाचे वजन केले असता एक किलो 50 ग्रॅम
  • रामसेतू याच दगडाने बांधला असावा असा अंदाज
  • बुलडाणा जिल्हयात चर्चेला उधाण

बुलडाणाः लंका प्रवेशासाठी श्रीराम चंद्रानी बांधलेल्या रामसेतू चा रामायणात उल्लेख आहे. ज्या दगडांनी हा सेतू बनलाय तोच पाण्यावर तरंगणारा एक दगड बुलडाणा लगतच्या येळगाव धरणात आढळून आल्याचा दावा केल्या जात असल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय बनला आहे. या दुर्मिळ दगडाचे वजन केले असता एक किलो 50 ग्रॅम भरले आहे. विशेष म्हणजे या दगडावर भगवान श्री रामांचे नाव कोरले असल्याने आज 4 डिसेंबरला या रामसेतू च्या दगडाची दिवसभर चर्चा सुरु होती.

येळगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाख हे धरणा लगत असलेल्या शेतात काम करीत होते. दरम्यान त्यांचे भाऊ ब्रम्हानंद श्रीराम गडाख यांना शेताच्या काठावर धरणात वाहत येत असतांना एक दगड दिसून आला. ब्रम्हानंद यांनी सदर दगड कुतूहलाने न्याहाळत दगडाला पाण्यात बुडवून पाहीले. मात्र हा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याने विष्णु गडाख यांनी याच दगडाने रामसेतू बांधला असावा असा अंदाज वर्तविला आहे.

इतिहासातील नोंदीप्रमाणे 1500 व्या शतकापर्यंत रामसेतू हापाण्याबाहेर होता. त्यावरून चालत जाता येत असे. 1480 साली आलेल्या वादळामध्ये समुद्र आत शिरल्याने पाण्याखाली गेला असावा अस म्हंटल जातं. हिंदू धर्मातील रामायणात ह्या रामसेतू चा उल्लेख असून रामाने लंकेत जाण्यासाठी हा बांधला अस सांगितलं आहे. रामसेतू हा स्थापत्यशास्त्राचा आणि रामायणाच्या इतिहासातील नोंदीचा एकमेव साक्षीदार आहे अस म्हंटल जातं. ह्यावर संशोधन करणान्या वैज्ञानिकांच असं म्हणणं आहे कि ह्याच्या दगडांवर कोरलेल्या तारखांवरून ह्याचं वय 7000 वर्षे आहे जे कि रामसेतू मध्ये आढळून येतात. तिथल्या दगडांचं, मातीच वय हे अवघ 4000 वर्षे आहे. म्हणजेच ज्या दगडांनी हा सेतू बनला आहे ते दगड दुसरीकडून कुठून तरी आणून त्यांची ब्रिज प्रमाणे रचना केली गेली आहे. म्हणजेच हा सेतू मानवनिर्मित आहे ह्यावर शिक्कामोर्तब होत असल्याचे संशोधक सांगतात. मात्र हे दगड कसे आणले आणि हे काम कसे केले गेले असेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र येळगाव धरणात तरंगणारा दगड सापडला असल्याच्या दाव्यामूळे  बुलडाणा जिल्हयात चर्चेला उधाण आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floating stone on the water found in the dam