भामरागडला पुन्हा पुराचा फटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

गडचिरोली : जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती उद्‌भवली आहे. भामरागडमध्ये पर्लकोटा नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक घरे पाण्याखाली होती. 500 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मात्र, पुराचे पाणी घरांत तसेच दुकानांत शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. रविवारी (ता. 8) येथील पूरपरिस्थिती कायम आहे. पर्लकोटाचे पाणी हेमलकसा गावापर्यंत पोहोचले. यामुळे भामरागड-आलापल्ली मार्गाची वाहतूक बंद होती. दिना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी-मुलचेरा हा मार्गही आज बंद होता.

गडचिरोली : जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती उद्‌भवली आहे. भामरागडमध्ये पर्लकोटा नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक घरे पाण्याखाली होती. 500 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. मात्र, पुराचे पाणी घरांत तसेच दुकानांत शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. रविवारी (ता. 8) येथील पूरपरिस्थिती कायम आहे. पर्लकोटाचे पाणी हेमलकसा गावापर्यंत पोहोचले. यामुळे भामरागड-आलापल्ली मार्गाची वाहतूक बंद होती. दिना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी-मुलचेरा हा मार्गही आज बंद होता. रस्ते बंद असल्याने भाजीपाला तसेच अन्य जीवनावश्‍यक सामानाची चणचण जाणवत आहे. मागील सहा वर्षांतील भीषण पूरपरिस्थिती उद्‌भवल्याने घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने नागरिकांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood water enters in bhamragarh market