वर्धा नदीला पूर, जलालखेडावासींनी केले जलपूजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

खेडा (जि. नागपूर) : वर्धा नदीमुळे नागपूर व नागपूर जिल्हा असे दोन भाग झाले आहेत. या नदीच्या आतापर्यंत आलेल्या महापुरामुळे अनेक गावांचे नुकसान होऊन जीवहानीदेखील झाली आहे. तरी मात्र ही नदी या नदीकाठच्या गावांसाठी जीवनदायी असल्यामुळे या नदीचे मोठ्या प्रमाणात खोलीकरण करण्यात आले व आता वाट होती पुराची. पूर आला व नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. इतकेच नव्हे तर जलालखेडा येथील गावकऱ्यांनी चक्क नदीवर जाऊन जलपूजनदेखील केले.

मध्य प्रदेशातून येणाऱ्या वर्धा नदीकाठच्या गावाने अनेक महापूर पहिले व यात मोठे नुकसान होऊन जीवित, मालमत्तेची हानी झाली. तरी मात्र पिण्याचे पाणीही मिळावे यासाठी हीच नदी जीवनदायी असल्याचे गावकऱ्यांना समजून चुकले आहे. त्यामुळे ते जुन्या झालेल्या घटना विसरत नदीच्या पुनरुज्जीवन करण्याच्या कामांसाठी कामाला लागले आहेत. यासाठी ते शासनाच्या भरवशावर न राहता लोकवर्गणीतून नदीचे खोलीकरण करीत आहेत. याचा लाभ मागील वर्षी नदीला पाणी न आल्यामुळे गावकऱ्यांना झाला नाही. यामुळे या नदीकाठच्या अनेक गावांनी पिण्याच्या पाण्यासाठीदेखील वणवण करावी लागली होती. तेव्हापासून नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांना नदीला पुराची वाट पावसाळा लागला तेव्हापासूनच होती. पण अर्धा पावसाळा होऊनही नदीला पाणी येत नसल्यामुळे गावकऱ्यांची निराशा होण्यास सुरुवात झाली होती. पण दोन दिवसांपूर्वी नदीला पूर आला व नदीकाठच्या गावांतील शेतकरी व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. आता आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेलच तसेच शेतातील सिंचन विहिरीची पाण्याची पातळी वर येईल यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. इतकेच नव्हे तर जलालखेडा येथील गावकऱ्यांनी चक्क नदीवर जाऊन नदीला आलेल्या पाण्याचे जलपूजन करून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी जलालखेडा येथील माजी सरपंच रमेश वाडकर यांनी श्रीफळ वाहून जलपूजन केले. या प्रसंगी माजी उपसरपंच प्रदीप कळंबे, रवींद्र पांडव, मुस्तफा बाणवा, इस्माईल गादीवाले व अन्य गावकरी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flooding of Wardha river, Jalalakheda residents worshiped Jal Poojan