सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर 'जेष्ठ नागरिक'

अनिल कांबळे
सोमवार, 2 एप्रिल 2018

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सायबर क्राईम जनजागृतीसुद्धा करीत आहे. तरीही बँक, विमा कंपनी, फॉरेनवरून आलेली भेटवस्तू आणि लॉटरीच्या नावाखाली वृद्धांची फसवणूक केली जाते.

नागपूर - एटीएम कार्ड, क्रेडीट कार्ड बंद पडल्याची थाप देऊन सायबर
गुन्हेगार जेष्ठ नागरिकांना गंडविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ
होते. शासकीय सेवेतून निवृत्त आणि उच्चशिक्षित जेष्ठ नागरिकसुद्धा सायबर
गुन्हेगारांचे बळी ठरत आहेत. बँकींग प्रणाली आणि तंत्रज्ञानाची योग्य
माहिती नसल्यामुळे जेष्ठ नागरिकांना गंडविणे सोपे जात आहे. जेष्ठ
नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्याच्या 20 टक्‍के घटना राज्यात घडल्याची नोंद आहे.

पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी जेष्ठ नागरिकांची सुरक्षेसाठी
अनेक सकारात्मक उपाययोजना केल्या आहेत. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सायबर क्राईम जनजागृतीसुद्धा करीत आहे. तरीही बँक, विमा कंपनी, फॉरेनवरून आलेली भेटवस्तू आणि लॉटरीच्या नावाखाली वृद्धांची फसवणूक केली जाते. अजनीत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याला एटीएम कार्ड बंद पडल्याच्या नावाखाली साडेसहा लाखांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. "अमूक बँकेतून बोलतोय..तुमच्या एटीएमची सेवा समाप्त झाली आहे... कृपया एटीएम पासवर्ड सांगा...' अशा प्रकारचा संवाद साधून जेष्ठ नागरिकांची फसवणूक केल्या जात आहे. बँकेतून फोन असल्यामुळे विश्‍वासाने वृद्ध साहजिकच सर्व माहिती सांगतात. तेथेच त्यांची फसवणूक होते. हा गंडा घालण्याचा नवा ट्रेंड असल्याचे सायबर क्राईम तज्ञ सांगतात. तसेच विमा पॉलिसीच्या नावाखाली वृद्धांना गुंतवणूकीच्या दुप्पट पैसा देण्याची स्किम सांगतात. अशा आमिषांना वृद्ध बळी पडतात आणि त्यांची फसवणूक होते. यासोबतच अनेक जेष्ठ नागरिकांना फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्‌सअॅपवरही मुलींच्या नावाचा प्रोफाईल ठेवून आर्थिक लुबाडणूक करतात. राज्यभरात वृद्धांच्या ऑनलाईन फसवणूकीच्या 20 टक्‍के घटनांची नोंद आहे.

वृद्धांनी अशी घ्यावी काळजी
- अनोळखी फोनला प्रतिसाद देऊ नये.
- अनोळखी ई-मेल्स, फेसबुक फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट स्विकारू नका.
- एटीएमचा पासवर्ड कुणालाही सांगू नका.
- पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करू नका.
- एटीएममधून पैसे काढताना कुणाची मदत घेऊ नका.
- बँकेतून फोन असल्याचे सांगितल्यास फोन कट करावा.
- एटीएम बंद पडल्याचे सांगितल्यास बँकेत स्वतः जाऊन चौकशी करण्याचे सांगावे.
- विमा काढाचा सल्ला दिल्यास थेट नकार द्यावा.
- लाखोंची लॉटरी लागल्याचा फोन आल्यास विश्‍वास ठेवू नका.

पासवर्ड लक्षात राहत नाही. तसेच दृष्टी योग्य नसते. त्यासाठी कुणाची मदत
घ्यावी लागते. ऑनलाईन व्यवहार करणे धोक्‍याचे आहे. जेष्ठ नागरिक सॉफ्ट
टार्गेट असल्याने वृद्ध लुटल्या जातात. त्यामुळे फोन आल्यास बोलूच नव्हे
किंवा फोन कट करावा, असे हुकूमचंद मिश्रीकोटकर यांनी सांगितले. तर सायबर क्राईमचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत भरते म्हणाले,  
'वृद्धांची फसवणूक होऊ नये म्हणून जनजागृती केल्या जाते. वृद्धांचे
विरंगुळा केंद्र, संघटना, जेष्ठांच्या सभा आणि जेष्ठ नागरिक मंडळांमध्ये
जाऊन फसवणूक होऊ नये म्हणून कार्यक्रम घेतल्या जातात. शहरात ठिकठिकाणी जणजागृतीचे फलक लावल्या जातात. जेष्ठांनी संभाव्य धोके लक्षात घेता 100 नंबर किंवा जेष्ठ नागरिक सेलच्या 072-2233680 या क्रमांकावर फोन करावा.'

Web Title: The focus of the cyber criminal has focused on the elderly