खाद्य पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

खाद्य पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
नागपूर : शनिवारी रात्री हिंगणा मार्गावर खाद्यपदार्थाच्या डिलेव्हरीनंतर परतताना एका तरुण कर्मचाऱ्याच्या दुचाकीला भरधाव ट्रेलरने धडक दिल्यावर त्याचा जागीच मृत्यू झाला.

अर्जुन रामकृष्ण पवार (वय 21, जयताळा, नागपूर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो नुकताच "झोमॅटो' या ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून लागला होता. शनिवारी रात्री यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगजवळून एकाने कंपनीत ऑनलाइन पद्धतीने खाद्यपदार्थाची ऑर्डर दिली होती. ते वेळेत पोहोचवण्यासाठी अर्जुन दुचाकीने गेला. परत येत असताना सेंट झेव्हिअर्स शाळेजवळील टी पॉइंटवर त्याच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. टिप्पर मालक महेश शिवलाल दुवारे (37, अमरनगर, एमआयडीसी) याने तातडीने अर्जुनला जवळच्या रुग्णालयात हलविले. परंतु, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी आरोपी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Food worker Death in Accident

टॅग्स