esakal | नक्षल्यांनी पहिल्यांदाच आरक्षणावर जाहीर केली भूमिका; छापले पत्रक
sakal

बोलून बातमी शोधा

नक्षल्यांनी पहिल्यांदाच आरक्षणावर जाहीर केली भूमिका

नक्षल्यांनी पहिल्यांदाच आरक्षणावर जाहीर केली भूमिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : आरक्षण हा खुळखुळा (Maratha reservation) आहे. त्यात आपली शक्ती खर्च घालू नका. मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा (Beware of broker leaders). ते तुमच्यातील संघटित शक्तीला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत आहे, अशा आशयाचे पत्रक भारताची कम्युनिस्ट पार्टी (Communist Party of India) (माओवादी) यांनी छापून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नक्षलवाद्यांनी प्रथमच भूमिका उघड (Naxals exposed role) केली आहे. (For-the-first-time-the-Naxals-announced-their-role-in-the-reservation)

मराठ्यांना आरक्षणासाठी लढावे लागणे म्हणजे देशावरील कृषी संकटाचा भाग आहे. आरक्षण कोणत्याही समाजाला न्याय-समानता देऊ शकला नाही. काळाच्या ओघात जसे अन्य समाजीतील नागरिकांमध्ये बदल होत आहे तसे बदल मराठा समाजातही होत आहे. स्वताच्या मेहनतीवर जगणारा शेतकरी समाज आज आरक्षणासाठी ओरडत आहे. ही समस्या म्हणजे देशीतील कृषी संकटाचेच लक्षण आहे. याला सरकारी धोरण जबाबदार, असेही पत्रात नमुद आहे.

हेही वाचा: श्रद्धापूर्ण भीती! चोरीनंतर चोरट्याने देवीला हात जोडून मागितली क्षमा

सर्वच पक्षांच्या नेत्यांची नियत खोटी आहे. ते मराठा समाजाचे हीत कधीच साधणार नाही. त्यांचे गणित देन बाबींवर अवलंबून असते. मराठी समाच त्यांना केवळ वोट बँकेसाठी पाहीजे आहे. महाराष्ट्राच्या सत्तेवर जास्तीत जास्त काळ मराठा समाजातून आलेले नेते मंडळी राहिली आहे. असे असतानाही मराठा समाजाची अशी अधोगती का झाली, असेही पत्रकात नमुद आहे.

(For-the-first-time-the-Naxals-announced-their-role-in-the-reservation)