अकोला : विदेशी दारू, लोखंडी गेट चोरणारा गजाआड

सहा गुन्हे उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
 विदेशी दारू लोखंडी गेट 
     चोरणारा गजाआड
विदेशी दारू लोखंडी गेट चोरणारा गजाआडsakal

अकोला : बोरगाव मंजू येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाईन बार फोडून विदेशी दारूचा मुद्देमाल चोरी करणारा अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून लोखंडी गेट चोरी करणाऱ्याला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या पथकाने एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले.

बोरगाव मंजू हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांकावर सहावरील एका वाईन बारचे शटर लॉक तोडून चार लाख १९ हजाराचा विविध कंपनीचा विदेशी दारूचा माल चोरीला गेला होता. या संदर्भात बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हाचा तपास पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे दिला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून तसेच अभिलेखावरील गुन्हेगाराबाबत रेकॉर्ड पडताळले असता हा गुन्हा आरोपी शेख रफिक शेख बशीर (५० रा. नायगाव) याने केल्याचे निष्पण झाले. त्यावरून आरोपीस ताब्यात घेत सखोल विचारपूस केली. मात्र, तो तपासात सहकार्य करीत नसल्याने त्यास अटक करून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

पोलिस कोठडीत केलेल्या विचारपूसनंतर त्याने साथीदाराचे मदतीने बोरगाव मंजू रोडवरील वाईन बारचे शटर तोडून विदेशी दारू चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल आरोपीने ताहीर अहमद जमीर अहमद (३१, रा.पेठ मोहल्ला नांदुरा जि.बुलडाणा) यास विकल्याचे सांगितले. चोरीचा माल खरेदी करणाऱ्या आरोपीस अटक करून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रकीया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, ए.एस. आय.दशरत बोरकर, नितीन ठाकरे, गोकुळ चव्हाण, लिलाधर खंडारे, शेख अन्सार, स्वप्निल खेडकर, विजय कबले, शेख नफिस, अक्षय बोबडे यांनी केली.

तेल्हारा, बार्शीटाकळीतील गुन्ह्यांची कबुली

आरोपी शेख रफिक शे.बशीर याला अटक केल्यानंतर त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून लोखंडी गेट तसेच इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. त्यात उरळसह बाळापूर तालुक्तातील तीन गुन्हे, तेल्हारा येथील एक, बार्शीटाकळी येथील येथून १० लोखंडी गेट, वेल्डीग मशीन चोरीकरून नांदुरा येथे विक्री केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील चोरीस गेलेले १० लोखंडी गेट, एक वेल्डीग मशीन, गुन्ह्यात वापरलेले मालवाहू वाहन असा एकूण सहा लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com