वन विभागाकडून 6 शिकाऱ्यांना अटक; रायफलसह काडतूसे जप्त

रामदास पद्मावार
शनिवार, 28 एप्रिल 2018

दिग्रसपासून २० कि.मी..अंतरावर असलेल्या डेहणीवर्तुळ वडगांवबीट परिसरातील जंगलात निसार अजगर अली तंवर, शे.हुसेन शे. महेबुब, म. सलीम हाजी अयुब हे तिघे सदोबा सावळीचे व म. फारुक पारेख, म. अनीस अ.रज्जाक व शे. वजीद शे.गुलाम हे तिघे कलगावचे हे सहा वन्यजीव शिकारी शिकार करण्याच्या उद्देशाने मध्यरात्रीला भटकत होते.

दिग्रस : दिग्रसच्या वन विभागाला पक्की माहिती मिळताच २७ व २८ एप्रिलच्या मध्यरात्री एकच्या सुमारास सापळा रचुन ६ वन्यजीव शिकाऱ्यांवर झडप घालून त्यांच्या जवळील १ रायफल, २ जिवंत काडतुस, ३ वापरलेली काडतुसे, २ सत्तुर व २ चाकू सह ६ मोबाईल, १ कार व ३ दुचाकी असे आरोपींकडून जप्त करण्याच्या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली असुन. वन विभागाच्या या धडक कार्यवाहीने जंगलचोर व शिकारयांचे धाबे दणाणले आहेत.

दिग्रसपासून २० कि.मी..अंतरावर असलेल्या डेहणीवर्तुळ वडगांवबीट परिसरातील जंगलात निसार अजगर अली तंवर, शे.हुसेन शे. महेबुब, म. सलीम हाजी अयुब हे तिघे सदोबा सावळीचे व म. फारुक पारेख, म. अनीस अ.रज्जाक व शे. वजीद शे.गुलाम हे तिघे कलगावचे हे सहा वन्यजीव शिकारी शिकार करण्याच्या उद्देशाने मध्यरात्रीला भटकत होते. यांच्या हालचालीची खबर दिग्रसचे वनपरिक्षेत्राधिकारी आनंद धोत्रे यांना मिळाली. आपल्या वनपाल व वनरक्षक यांच्या टिम बरोबर वडगांवला पोहचले व शिका-यांचा मागोवा घेऊ लागले अस्यात  तिन दा बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज झाला. त्या दिशेने वनपरिक्षेत्राधिकारी व त्यांची टिम गेली आणि सशस्त्र शिकाऱ्यांवर झडप घातली.या झडपडीत क्षेत्र सहाय्यक गुलशर खॉ.रहिम खॉ.पठाण यांच्या छातीला शिका-याच्या हातचा सत्तुर लागल्याने व सोबतचा वनरक्षक अश्विन मुजमुले हे जख्मी झालेत. जिवाची पर्वा न करता वनअधिकारी व करमीचारयांनी ६ शिका-यांचे मुचके बांधून त्यांना ताब्यात घेण्यात यश आले दरम्यान झटापटीत १ आरोपी पसार झाला. शस्त्रात्र व मोबाईलसह एम.एच.२९ एस.सी.१८८८ क्र‘. टोयोटो कार व ३ मोटारसायकली वन विभागाने ताब्यात घेतल्या. 

या घटनेची माहीती मिळताच पुसदचे सहाय्यक वनस्वरक्षक (प्रादे.वन्यजीव) भगवान पायघण हे दिग्रस वनविभागाच्या कार्यालयात पोहचलेत. घटनेची कायदेशीर नोंद केली. या कारवाईत वनपरीक्षेत्र अधिकारी आनंद धोत्रे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक प्रकाश जाधव, अनिल सोनोने, वनपाल रफिक अहेमद ,संतोष जाधव, वनरक्षक गौतम बरडे, संतोष बदुकले,अनिल इंगोले, अयुब पठाण,अनिल राठोड, अमीर पठाण व वनमजुर आदींनी मोलाची कामगिरी बजावली.

Web Title: forest department arrested 6 poachers