अधिकाऱ्याच्या पत्नीसाठी बदलीचे निकष बदलले; वनविभागातील अजब प्रकाराबाबत संताप

अधिकाऱ्याच्या पत्नीसाठी बदलीचे निकष बदलले; वनविभागातील अजब प्रकाराबाबत संताप

अमरावती ः वनपरिक्षेत्र अधिकारी ते सहायक वनसंरक्षक पदोन्नतीसाठी (Promotion) विभागीय समितीची बैठक दोन वर्षांपूर्वी होऊन निवडसूचीवर शिक्कामोर्तब झाले. 27 पदे भरण्याची शिफारस समितीने केली. परंतु याप्रकरणात वरिष्ठ स्तरावरील एका अधिकाऱ्याच्या पत्नीसाठी निकषच बदलल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.(Forest department changed rules of postings for officers wife)

अधिकाऱ्याच्या पत्नीसाठी बदलीचे निकष बदलले; वनविभागातील अजब प्रकाराबाबत संताप
दिलासादायक! नागपुरात बाधितांच्या तुलनेत दुपटीने कोरोनामुक्त

सामान्य प्रशासन विभागाने त्यासाठी मान्यता दिली आहे. वनबल प्रमुखांच्या मान्यतेने 27 अधिकाऱ्यांच्या महसूल विभागनिहाय पदस्थापनेचा प्रस्ताव तत्काळ सादर करणे आवश्‍यक आहे. असे मत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी व्यक्त केले होते. तसे पत्र 22 मार्च 2021 रोजी महसूल व वनखात्याच्या प्रधान सचिवांना दिले. हा कालावधी वणव्यांचा असून महाराष्ट्रातील मोठे वनक्षेत्र आगीच्या कचाट्यात सापडले होते.

सध्या सहायक वनसंरक्षक संवर्गात 316 पैकी 120 पदे रिक्त आहेत. त्यामुळे 27 अधिकाऱ्यांनी दिलेल्या अर्जाचा महसूल विभागाने पसंतीक्रम विचारात घेऊन नियमानुसार त्यांना महसूल विभागाची यादी तत्काळ उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांच्या पदस्थापनेचा प्रस्ताव तत्काळ शासनास सादर करता येईल, असेही या पत्रात नमूद केले आहे. मात्र मंत्रालयातील वनखात्याने आता नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीतील निवडसूची रद्द ठरवून नव्याने विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेण्याचा घाट घातला आहे.

अधिकाऱ्याच्या पत्नीसाठी बदलीचे निकष बदलले; वनविभागातील अजब प्रकाराबाबत संताप
अपार्टमेंटमध्ये चालू होता देहविक्रीचा व्यवसाय; संतप्त नागरिक धडकले पोलिस ठाण्यावर

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीसाठी हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप आहे. मंत्रालय स्तरावरून विभागीय पदोन्नती समितीची पूरक बैठक घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका अधिकाऱ्याच्या पत्नीसाठी वनखाते वेठीस धरले जात आहे, अशी भावना पदोन्नती यादीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

(Forest department changed rules of postings for officers wife)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com