एटापल्लीत वन विभागाचा जाळला लाकूड डेपो

एटापल्लीत वन विभागाचा जाळला लाकूड डेपो

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदच्या प्रभावाने गट्टा, जारावंडी, कसनसुर, अहेरी व गडचिरोली,कोरची, भामरागड तालुक्यात वाहतूक नक्षल्यांनी रस्त्यावर झाड़े आडवी टाकून व बॅनर बांधून अडविल्याने सकाळपासून वाहतूक बंद आहे. तसेच दुपारपर्यंत बाजारपेठही व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्यात आली होती.

गेल्या महिन्यात जहाल महिला माओवादी रामको नरोटी व शिल्पा दूर्वा यांना भामरागड तालुक्यातील गुडूरवाही जंगलात पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार केल्याच्या निषेधार्थ आज (रविवार) जिल्हा बंद पाळून घटनेचा व शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवण्याचे आव्हान हिंदी, मराठी व आदिवासी मीडिया भाषेतील पत्रके व बॅनरमधून करण्यात आले होते. वन विभागाच्या लाकूड डेपोलाही आग लावल्याने वन विभागाचे मोठे नुकसान झाले.

आज सकाळी साडेसहा वाजता एटापल्लीवरून जाणारी नागपूर आगाराची पहिली बसफेरी एटापल्लीपासून 5 किमी अंतरावर गुरूपल्ली गावाजवळ सुरजागड पहाडीवरील लोहखनिज वाहतूक करणारे जळीत ट्रकपर्यंत जाऊन परत आली. त्या ठिकणी झाडे आडवी टाकून बंद पाळण्याच्या मजकूर लिहिलेली बॅनर व शेजारीच असलेल्या वनविभागाच्या लाकडी बिटाना आग लावण्यात आली. यात वनविभागाचे लाखो रुपये नुकसान झाले आहे.

नक्षल्यांचा चौफेर धुमाकुळ दिसून येत असल्यामुळे एटापल्लीची मुख्य बाजारपेठही दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नक्षली दहशतीचा परिणाम तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून दक्षता बाळगली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com