काँग्रेसचे माजी आमदार सानंदा यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

श्रीधर ढगे
मंगळवार, 4 जून 2019

खामगाव : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी वंचित आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याने राजकिय वर्तुळात नवीन चर्चा सुरू आहेत.

खामगाव : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी वंचित आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याने राजकिय वर्तुळात नवीन चर्चा सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांच्या पक्षांतराच्या बातम्या येत आहेत. दरम्यान खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी बाहुबली आमदार दिलीप कुमार सानंदा आणी भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट झाली. गृहमंत्री रणजित पाटील यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याकरीता विखे पाटील अकोला आले तेंव्हा त्यांनी खामगाव येथे सानंदा निकेतनवर भोजन केले. काँग्रेस जिल्हाद्यक्ष राहुल बोंद्रे यांची सुद्धा उपस्थिती होती. मात्र ही भेट पारिवारिक असून विखे यांनी काँग्रेस सोडू नये अशी विनंती मी केली असे सानंदा यांनी सांगितले. ही चर्चा थांबत नाही तर आज माजी आमदार सानंदा यांनी ऍड बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर ते वंचित आघाडीसोबत जवळीक साधत असल्याची चर्चा सुरू आहे.

वंचित आघाडीची खामगाव मतदार संघात मोठी ताकद असून भारीपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांची या मतदार संघावर चांगली पकड आहे. त्यामुळे सानंदा आंबेडकर भेटीकडे राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मानल्या जात आहे. दरम्यान याबाबत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना विचारले असता आज ऍड बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली. त्यांचा माझा जुना स्नेह आहे असे सानंदा म्हणाले. बाकी राजकिय भूमिकेबाबत विचारले असता, मात्र नो कॉमेंट्स असे  सानंदा म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former congress MP Sananda meets Prakash Ambedkar