खरे कोण, मुख्यमंत्री की कृषिमंत्री? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नागपूर - बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत देण्यात येईल असे रविवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक येणार असून पाहणीनंतर दीड महिन्यांना मदत वाटप केले जाईल, असे सांगितले. यामुळे नेमके कोण खरे बोलत आहे असा सवाल माजी मंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. 

दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मदत देणार की नाही असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन आटोपले. शेवटच्या दिवशी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषिमंत्र्यांनी विधानसभेत मदत जाहीर केली होती. यास चार महिने उलटून गेले. मात्र अद्याप भरपाई देण्यात आली नाही.  रविवारी खरीप आढाव बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळी तारीख जाहीर केली. मागील खरीप हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आणि यामुळे मोठया प्रकाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कृषी व महसुल विभागाकडून याचा अहवाल तयार करण्यात आला. या अहवालातुन काटोल,नरखेड, कळमेश्वर, रामटेक व मौदा तालुक्‍यात नुकसान झाले नाही म्हणुन वगळण्यात आले होते. विषयावर राष्ट्रवादीच्या  वतीने काटोल, नरखेड व नागपूर येथे आंदोलन केल्यानंतर सरकारला जाग आली आणि यानंतर फेरसर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले.

Web Title: former minister Anil Deshmukh presented the question who is telling the truth