माजी मंत्री वसंत पुरके यांच्या वाहनाला अपघात

file photo
file photo

कळंब (जि. यवतमाळ) : बाभूळगाव येथून कळंबकडे येत असताना दुचाकीस्वाराला वाचविताना चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला घेतले असता गिट्टीच्या ढिगाऱ्यावर आदळले. यात माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या नाकाला मार लागला. धोटे जिनिंगजवळ शनिवारी (ता. 22) दुपारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अल्पसंख्याक कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबाभाई ऊर्फ इमरान सय्यद यांनी तत्काळ वसंत पुरके यांना खासगी वाहनाने यवतमाळ येथे उपचारासाठी आणले. वाहनात त्यांच्यासोबत स्वीय सहायक मानेकर व चालक असे तिघे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com