माजी आमदार यादवराव भोयर यांचे निधन

माजी आमदार यादवराव भोयर
माजी आमदार यादवराव भोयर

माजी आमदार यादवराव भोयर यांचे निधन
कामठी (नागपूर) : कामठी-कुही क्षेत्राचे माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य लघुद्योग व रोजगार हमी योजना महामंडळचे माजी अध्यक्ष यादवराव भोयर यांचे रविवारी (ता. 11) दीर्घ आजाराने छावणी परिषद परिसरातील निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी ते 78 वर्षांचे होते. भोयर हे 1985 ते 1995 या कालावधीत कॉंग्रेसकडून कामठी-कुही विधानसभेवर निवडून आले होते. काही वर्षे ते नगर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षही राहिले. त्यांनी श्री. सदाशिव राव पाटील शिक्षण संस्थेची स्थापना केली. कामठी व भंडारा जिल्ह्यात अनेक शाळा व महाविद्यालये सुरू केले. विद्यार्थ्यांना विविध शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. अंत्ययात्रा सोमवारी दुपारी तीन वाजता येरखेडा येथील निवासस्थानाहून निघेल. कामठी येथील सदाशिवराव शिक्षण संस्था पाटील शिक्षण संस्था परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येईल. ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांचे वडील होत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com