माजी रणजीपटू अमोल जिचकारची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सिव्हिल लाइन्स परिसरात राहणाऱ्या अमोलने काही दिवसांपूर्वीच विपुल पांडे नावाच्या मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये लॉ कॉलेज चौकात रेस्टॉरंट सुरू केले होते. विपुल हादेखील माजी क्रिकेटपटू आहे.

नागपूर - विदर्भाचा माजी रणजीपटू अमोल जिचकारने आज (मंगळवार) सकाळी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय अमोलने 1998 ते 2002 या कालावधीत रणजी स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व केले. फिरकीपटू राहिलेल्या अमोलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा सामन्यांत 3.64 च्या इकॉनॉमी रेटने सात गडी बाद केले होते. याशिवाय 19 वर्षांखालील मुलांच्या कुचबिहार करंडकातही त्याने विदर्भाचे प्रतिनिधित्व केले होते. 

सिव्हिल लाइन्स परिसरात राहणाऱ्या अमोलने काही दिवसांपूर्वीच विपुल पांडे नावाच्या मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये लॉ कॉलेज चौकात रेस्टॉरंट सुरू केले होते. विपुल हादेखील माजी क्रिकेटपटू आहे. अमोलचे आईवडील सध्या पुण्यात आहेत. अमोलला अवनिश एका मुलगा देखील आहे. या घटनेने जिचकार कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून, त्यांनी या घटनेविषयी अधिक बोलण्यास नकार दिला.

Web Title: Former Ranji player Amol Jichkar suicides